पालखेड ओव्हरफ्लो पाणी; बोलकीसह पुर्वभागातील सर्व बंधारे भरले-कोल्हे
Palkhed overflow water; All the dams in the east are filled with talk – Kohle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 13 Aug, 18.00
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : चालु पावसाळी हंगामात कोपरगांव तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाउस झालेला नाही त्यामुळे पुर्व भागाबरोबरच तालुक्यातील व मतदार संघातील गावतळी, बंधारे, पाझर तलाव, साठवण बंधारे, दगडी साठवण बंधारे, मातीचे बंधारे, शेततळी, ओढे नाले अद्यापही कोरडेच आहेत परिणामी नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण भासत असल्यांने बोलकी सह पुर्व भागातील बोलकी सर्व बंधारे , पालखेड कालव्याच्या ओव्हरफलोने भरून मिळावे म्हणून भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ संजय बेलसरे व पालखेडचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती. गोदावरी डावा- उजवा कालव्याच्या पाण्याने परिसरातील बंधारे भरावे याबाबतही चर्चा झाली.
त्याप्रमाणे पुर्व भागातील कोळनदीवरील सर्व बंधारे पालखेडच्या पाण्याने भरून मिळाल्यांने परिसरातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी यासंदर्भात जलसंपदा विभागाकडे याबाबत पत्रव्यवहार करून संबंधीत अधिका-यांशी नाशिक कार्यालयात प्रत्यक्ष चर्चाही केली होती. पर्जन्यमान कमी असल्यांने भूगर्भातील पाण्याची पातळीही कमी झालेली आहे. सध्या नाशिक त्रंबकेश्वर, घोटी, ईगतपुरी भागात पाउस चांगल्या प्रमाणात होत असल्यांने सर्व धरणातील पाणी साठा शंभर टक्के होत आला आहे. कोपरगांव शहराला देखील आठ दिवसाच्या ऐवजी दररोज पाणी देण्याबाबतच्या नियोजनाची देखील चर्चा झाली आहे. पुर्व भागातील शेतक-यांनी कोळनदीचे बंधारे भरून मिळाले म्हणून मागणी केली होती, त्याचप्रमाणे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विश्वासराव महाले यांनीही नारंदी नदीवरील सर्व बंधारे भरून मिळावे म्हणून मागणी केली होती त्याप्रमाणे हे सर्व बंधारे पालखेड ओव्हरफलोच्या पाण्याने भरले आहेत, या कामी पालखेड उपविभाग येवला येथील अभियंता श्री. एस एस. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे. यातुन पिण्यांसह जनावरांच्या पाण्याची अडचण काही प्रमाणांत दुर होणार आहे. सौ स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याबददल भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, बोलकीच्या सरपंच उषाताई कडाळे, उपसरपंच वसंतराव बोळीज, बोलकी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब महाले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे कामगार संचालक वेणुनाथ बोळीज, वसंतराव महाले, सर्व लाभधारक शेतकरी व पुर्व भागातील सर्व शेतकरी, भाजपाचे सर्व पदाधिकारी, संजीवनी उद्योग समुह सलग्न संस्थाचे आजी माजी पदाधिकारी आदिंनी आभार मानले आहे.
Post Views:
180