हर घर तिरंगा अभियान व स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करा -स्नेहलता कोल्हे
Celebrate Har Ghar Tricolor Campaign and Independence Day as National Festival -Snehlata Kolhe
नगरपालिका राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते उदघाटन Inauguration of Municipal National Flag Sales Center by Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 13 Aug, 18.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते झाले.
येवला रोडवरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, स्वातंत्र्य मिळून यंदा ७५वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी हर घर तिरंगा हा नारा देऊन येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. पंतप्रधान मोदीजींची ही संकल्पना अतिशय स्तुत्य असून, आपण सर्वांनी १५ ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. घराच्या प्रांगणात सडा रांगोळी काढून तसेच देशभक्तीपर गीत गायन, पथनाट्य, रॅली व इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा. आपला देश यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत. देशाबद्दल आत्मीयता व राष्ट्र प्रेमाची भावना जागृत ठेवून सर्व नागरिकांनी राष्ट्रीय सण म्हणून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि रक्षाबंधनचे औचित्य साधून कोपरगाव नगर परिषदेच्या माधवराव आढाव विद्यालय, नगर परिषद उर्दू शाळा व न. प. शिक्षण मंडळाच्या सर्व शाळेतील विद्यार्थिनींतर्फे “एक राखी जवानांसाठी” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनीनी अहमदनगर येथे जाऊन जवानांना राख्या बांधल्या. त्यांचे सौ स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले. तसेच सहेर तौसिफ मनियार या मुलीचा मोहरम चा रोजा सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते यावेळी सोडविण्यात आला.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुणकर, रवींद्र नरोडे, बाळासाहेब नरोडे, अविनाश पाठक, राजेंद्र पाटणकर, रवींद्रअण्णा पाठक, स्वप्निल निखाडे, शफिक सय्यद, खालिक कुरेशी, फकीरमंहमद पहिलवान, सागर जाधव, गोपीनाथ गायकवाड, शरदराव त्रिभुवन, नरेश डंबीर, संतोष साबळे, सतीश चव्हाण, सोमनाथ म्हस्के, विवेक सोनवणे, भानुदास पवार, बाबासाहेब साळुंके, अर्जुन मोरे, रमेश विध्वंस, इलियासभाई शेख, सचिन सावंत, कैलास खैरे, दत्ता कोळपकर, महेश खडामकर, राजेंद्र मेवाते, पिंटू नरोडे, संतोष नेरे, स्वप्निल कडू, साईम रहिम शेख,
किरण सूर्यवंशी, विजय गायकवाड, वैभव आढाव, वासुदेव शिंदे, सौ. शिल्पा रोहमारे, सागर राऊत, नितीन पोळ, पुरुषोत्तम जोशी, सुमित खरात, अशोकराव लकारे, सौ. वैशाली आढाव,सौ. दीपा गिरमे,सौ.मंगल आढाव, रमेश भोपे, राजेंद्र बागुल, शिवाजीराव खांडेकर, बाळासाहेब सोळसे, दिनेश कांबळे, बाळासाहेब आढाव, विष्णुपंत गायकवाड, अमोल राजूरकर, अनिल गायकवाड, राजेंद्र लहिरे, सुशांत खैरे, जनार्दन कदम, तिलकशेठ अरोरा, रोहन दरपेल, राहुल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Post Views:
178