अतिवृष्टीच्या पंचनामे  करा, दफनभूमी व स्मशानभूमीचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावा – ना. आशुतोष काळे

अतिवृष्टीच्या पंचनामे  करा, दफनभूमी व स्मशानभूमीचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावा – ना. आशुतोष काळे

Do panchnama of heavy rains, propose burial ground and crematorium immediately – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 13 Aug, 18.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव :काही दिवसांपासून सातत्याने पावसाची संततधार सुरु असून मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे अहवाल तातडीने शासनदरबारी पाठवा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी आढावा बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तहसील कार्यालय कोपरगाव येथे ना.आशुतोष काळे यांनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात बैठक घेवून महसूल व कृषी विभागाकडून सविस्तर माहिती घेतली व महसूल विभागाच्या विजय सप्तपदी अभियानासंदर्भात आढावा बैठक घेतली याप्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. तसेच कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील दफनभूमी व स्मशानभूमीच्या नागरिकांच्या अडचणी आहेत या अडचणी दूर करण्यासाठी दफनभूमी व स्मशानभूमीचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावा अशा सूचना दिल्या.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, कर्मवीर  काळे  कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे,  सुधाकर रोहोम, अनिल कदम, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, सुरेश जाधव, शंकरराव चव्हाण, विष्णु शिंदे, जिनिंग चेअरमन गोरक्षनाथ जामदार,  मधुकर टेके, श्रावण आसने, सुनील शिंदे, सुधाकर होन, चांगदेव आगवन, शांताराम डुबे, रामनाथ वैराळ, सुनील बोरा, शशिकांत देवकर, अशोक भोकरे, नानासाहेब चौधरी, दिगंबर बढे, सचिन वाबळे, शशिकांत वाबळे, लालू शेख, शमशुद्दीन शेख, चंद्रशेखर गवळी, सुनिल चव्हाण, धनराज पवार, बाळासाहेब पवार, भाऊसाहेब भाबड, जनार्दन पारखे, किरण दहे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता भूषण आचार्य, अभियंता अतुल खंदारे, कृषी अधिकारी मनोज सोनवणे,  योगेश सोनवणे, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संजय भास्कर,उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, तालुक्यातील तलाठी, मंडलाधिकारी, कृषी मंडलाधिकारी, ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते.

         

Leave a Reply

You cannot copy content of this page