राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच मतदार संघाच्या विकासाला बळकटी – ना.आशुतोष काळे

राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच मतदार संघाच्या विकासाला बळकटी – ना.आशुतोष काळे

The development of the constituency is strengthened only because of NCP Congress – No. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 13 Aug, 18.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदार संघाच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत केल्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच मतदार संघाच्या विकासाला बळकटी मिळाली असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करतांना सांगितले.

  जयंत पाटील हे  जिल्हा दौऱ्यावर आले असता ना. आशुतोष काळे यांनी त्यांचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले.

    यावेळी  जयंत पाटील यांनी ना.आशुतोष काळे यांच्याशी मतदार संघात सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. मागील अडीच वर्षात मतदार संघात केलेल्या हजारो कोटींच्या विकास कामांचे  जयंत पाटील यांनी यावेळी कौतूक केले. 

 शरद पवार  यांचे अनमोल मार्गदर्शन व माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तसेच महाविकास आघाडी सरकारच्या सर्व मंत्र्यांनी केलेल्या सहकार्यातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. असे सांगितले. यावेळी माजी ऊर्जा राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरेश्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे उपस्थित होते.

      

Leave a Reply

You cannot copy content of this page