सौ. स्नेहलता कोल्हे यांचे येसगांव निवासस्थानी हर घर तिरंगा अभियान
Mrs. Snehalata Kolhe’s Yesgaon residence Har Ghar Tricolor Abhiyan
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 13 Aug, 18.50
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव: कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी येसगांव निवासस्थानी हर घर तिरंगा अभियानात तिरंगा ध्वजास मानवंदना देत भारतीय स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा केला.
याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे, सौ. रेणुका विवेक कोल्हे उपस्थित होत्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय जे. पी. नड्डा यांनी देशात सर्वत्र भारतीय स्वातंत्राचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्याचे आवाहन केले होते त्यास कोपरगांव शहरासह संपुर्ण विधानसभा मतदार संघात नागरिकांचा मोठा प्रतिसाद असुन १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविले जात आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, भारत देशाला स्वातंत्र मिळुन ७५ वर्षे पुर्ण झाले. ही घटना संपुर्ण जगतात प्रकर्षाने सर्वांच्या स्मरणात रहावी त्यासाठी भारतात ” हर घर तिरंगा अभियान होत आहे. यातुन स्वातंत्राच्या चेतना आणि देशाबद्दलच्या अभिमानाची जाणिव होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व केंद्रीय मंत्री मंडळाने भारत देशाच्या एकता अखंडतेसाठी आजवर विशेष उल्लेखनीय योगदान देत आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्री मंडळाने देखील राज्यात हर घर तिरंगा अभियान एक उत्सव म्हणुन साजरा होण्यासाठी जिल्हा तालुका स्तरावर त्याचप्रमाणे ग्रामिण भागापर्यंत विशेष काळजी घेत असुन संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा, नागरिक, देशबांधव, स्वातंत्रसेनानी या अमृत महोत्सवी उत्सवात सहभाग देत असुन देशभक्तीपर गीत आणि तिरंगा ध्वजाची शान वाढवून स्वातंत्र्य जागर आठवणींना उजाळा देत आहे असेही सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.
Post Views:
196