एस.एस.जी.एम.महाविद्यालय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
S.S.G.M.College celebrated the Amrit Mahotsav of Independence
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 14 Aug, 17.10
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील श्री. सदगुरु गंगागीर महाराज कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी विद्यार्थ्यांना तहसीलदार विजय बोरुडे, सचिन सुर्यवंशी, डॉ. विकास घोलप, आदिनाथ ढाकणे प्राचार्य डॉ रमेश सानप आदी मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजांचे वितरण करण्यात आले जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र, सेना, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक, क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांसह ज्युनिअर विभागातील विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,
रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, रक्तदान शिबिर, प्राध्यापकांनी ग्रंथ भेट दिले.
प्राचार्य डॉ रमेश सानप यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सर्व उपक्रमांचे संयोजन प्रा. सुभाष देशमुख, प्रा. डॉ. चंद्रभान चौधरी, प्रा. शोभा दिघे, प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, प्रा. महेश दिघे, डॉ. बी. एम. वाघमोडे, डॉ. माधव यशवंत तसेच प्रा. सौ. छाया शिंदे, प्रा. एन. टी. बिरारी, प्रा. सौ. कलावती देशमुख, प्रा. जयश्री शेंडगे, प्रा.अक्षय आहेर, कर्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांनी केले.
स्वागत प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बी. बी. देवकाते यांनी केले. प्रा. सौ. छाया शिंदे यांनी आभार मानले.
सदर प्रसंगी उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर, प्रा. अरुण देशमुख, डॉ.विजय निकम, प्रा. रामभाऊ गमे आदींसह सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views:
256