स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ; संत ज्ञानेश्वर स्कूलकडून जनजागृती
Amrit Festival of Freedom; Awareness from Sant Dnyaneshwar School
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 14 Aug, 16.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये चित्रकला, वकृत्व, रांगोळी स्पर्धा व घोष वाक्य बनवा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले व “भारत माता की जय”,”वंदे मातरम” व “हर घर तिरंगा” आशा देशभक्ती पर घोषणा देत शहरातून प्रभात फेरी काढून जनजागृती केली.
संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
विद्यार्थी व शिक्षकांनी विविध घोष वाक्य तयार करून प्रभात फेरी च्या माध्यमातून नागरिकांना त्यातून देशभक्तीचे संदेश दिले.
यावेळी कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे, प्राचार्य सचिन मोरे,उपशिक्षिका वैशाली लोखंडे, वसुधा झावरे,प्रियांका शेलार,प्रियांका फाटक्कर,पूनम सूर्यवंशी,अनुप गिरमे,सागर खटावकर,शिक्षकेत्तर कर्मचारी अक्षय नन्नावरे,रवींद्र पवार, चंद्रहंस पाबळे, सतिश लोळगे आदी उपस्थित होते.
Post Views:
227