कोपरगाव हेल्पिंग हँड ; १६ वर्षात विद्यार्थ्यांना  शिक्षणासाठी  ४१ लाखाची मदत.

कोपरगाव हेल्पिंग हँड ; १६ वर्षात विद्यार्थ्यांना  शिक्षणासाठी  ४१ लाखाची मदत.

Kopargaon Helping Hand ; 41 lakhs aid for education to students in 16 years.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 15 Aug, 17.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव :  घरची आर्थिक परिस्थीती अत्यंत हालाखीची, पण शिक्षणाची ओढ असणाऱ्या दुर्बल घटकातील गुणवंत गोर-गरीब मुला-मुलींच्या आयुष्यात कोपरगांवच्या हेल्पींग हँड संस्थेने २००६ सालापासून आजपर्यंत ४१  लाख रुपयांची मदत केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष  (सी.ए.) दत्तात्रय खेमनर यांनी दिली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य उत्कर्षाचे जावे या भावनेतून केली जाणारी मदत लाख मोलाची असते असे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे. सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एस यादव यांनी केले. हेल्पिंग हँडसचे हे कार्य अनमोल असल्याचेही ते म्हणाले.

येथील हेल्पिंग हँड्सच्या वतीने आर्थिकदृष्ट्या गरीब,हुशार विद्यार्थांना उच्चशिक्षणासाठी दिल्या जाणऱ्या  धनादेशाचे वितरण नुकतेच करण्यात आले त्याप्रसंगी  डॉ. यादव अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून हेल्पर्स ऑफ दि हंॅडीकॅपड (कोल्हापूर)या संस्थेचे अध्यक्ष पी.डी.देशपांडे होते. 
         यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सीए दत्तात्रेय खेमनर,छाया ठाकूर,सविता चव्हाण तर कार्यक्रमास डॉ.इंद्रवदन दोडिया,विठ्ठलराव शिंदे,जवाहर शहा,प्रा. अविनाश घैसास,खरवंडीकर श्रीनिवास ,राजेंद्र कोयटे आदिसंह संस्थेचे आजी,माजी विद्यार्थी ,समाजातील विविध मान्यवर होते. 

          पी. डी.देशपांडे यावेळी म्हणाले,अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली. मात्र ग्रामीण भागात अजून हि काम करण्यासारखे खूप आहे.देशाबरोबर माणसे घडविण्याचे उत्कृष्ट कार्य हेल्पिंग हंॅड्स करीत आहे. योग्य वेळी विद्यार्थांना संस्थेच्या वतीने मदतीचा हात देत त्यांचे आयुष्य बदलून टाकण्याचे काम केले जात आहे.करण्यात येणारी मदत सत्पात्री असल्याची काळजी देखील संस्था घेते.विद्यार्थ्यांनी आयुष्यात येणाऱ्या तात्कालिक अपयशाने खचून न जाता ध्येयाचा पाठलाग केला तर यश निश्चित मिळेल.जे काम करावयास आवडते,ज्यातून आत्मिक समाधान लाभेल तेच कार्य करा.स्वतःची स्वतःशीच स्पर्धा करा.आयुष्यात छोटे छोटे उद्दिष्ट घ्या .यशाची शिखरे आपोआप पादांक्रांत होतील.

         यावेळी डॉ. दोडिया व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रा. गणेश देशमुख यांनी केले.आभार राजेंद्र कोयटे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page