शिंदे फडणवीस सरकारमधील भाजपच्या नव्या मंत्र्यांना सौ. स्नेहलता कोल्हेच्या शुभेच्छा
The new minister of BJP in Shinde Fadnavis government Mrs. Greetings Snehalata kohle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 15 Aug, 17.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांचे केलेले खाते वाटप चांगल्या प्रकारचे असून त्यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे यांच्यासह सर्व मंत्र्यांचे भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी विशेष अभिनंदन करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सौ.स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, राज्याच्या राजकारणांत अहमदनगर जिल्हयाचा दबदबा नेहमीच राहिलेला आहे. संजीवनी उद्योग समूहाचे संख्यापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे १९९१ मध्ये राज्याचे महसुल मंत्री होते. त्यानंतर त्यांनी सहकार, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क आदी महत्त्वाची खाती देखील सांभाळली होती.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर झाल्यामुळे राज्याच्या कामकाजाला विशेष गती मिळेल. तत्कालीन ऊर्जा मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले काम उल्लेखनीय असून आता त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवण्यात आल्याने त्यांचेही सौ स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views:
218