स्वातंत्र्य अमृत महोत्सव; साई समाधी मंदिरावर अध्यक्ष ना.आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण
Independence Amrit Festival; Hoisting of the flag at the Sai Samadhi Temple by President Ashutosh Kalen
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon15 Aug, 17.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभर हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत असून देशभर राष्ट्रप्रेमाला उधाण आले आहे. या मोहिमेत श्री साईबाबा संस्थान देखील सहभागी झाले असून अमृत महोत्सवानिमित्त कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा समाधी मंदिरावर साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशाप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक गाव आणि शहरातील प्रत्येक घरावर डौलाने फडकनाऱ्या तिरंग्यामुळे प्रत्येक देशवासीयांच्या रुदयात देशप्रेमाची ज्योत जागृत होवून संपूर्ण देश एकसंघ असल्याची प्रचिती येत आहे.यामध्ये श्री साईबाबा संस्थान देखील मागे राहिले नाही.त्यांनी देखील हजारो साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या उपस्थितीत देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करतांना श्री साईबाबा समाधी
मंदिरावर अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.
यावेळी ना.आशुतोष काळे यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित शुभेच्छा दिल्या असून देशाची एकता अखंडता टिकवून ठेवण्यासाठी द्वेष, मत्सर, भेदभाव या गोष्टींना दूर ठेवावे. त्यामुळे देशाला प्रगतीचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी पाठबळ मिळणार असून त्यामध्ये खरे देशहित दडले आहे.आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी प्रत्येकाने समता व बंधुत्वाची जपणूक करावी असे आवाहन केले.यावेळी शिर्डीच्या शैक्षणिक संकुलात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमास अध्यक्ष ना.आशुतोष काळे व मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
यावेळी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते,महेंद्र शेळके,सचिन कोते,सुनील शेळके,मुख्याधिकारी भाग्यश्री बानाईत उपस्थित होत्या.
चौकट – आज देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित ध्वजारोहण करण्याचे मला भाग्य मिळाले त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो – अध्यक्ष ना.आशुतोष काळे.
Post Views:
222