सहकारमहर्षी कोल्हे कारखाना कार्यस्थळावर सामूहिक राष्ट्रगीत
Mass National Anthem at Sahakar Maharshi Kolhe factory workplace
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 17 Aug, 18.20
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव:भारत देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे पुर्ण होवुन ७६ व्या वर्षात यशस्वी पर्दापणानिमीत्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामुहिक राष्ट्रगीताचे आवाहन केले होते.
त्यात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हे कारखान्यांचे संपुर्ण व्यवस्थापन सहभागी झाले होते.
कारखाना कार्यस्थळावर बुधवारी सामुहिक राष्ट्रगीत सादर करण्यांत आले. याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश दादा घोडेराव, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, एच आर मॅनेजर प्रदीप गुरव यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उप खातेप्रमुख, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.