आते भाऊ व मामे भावाचा अंकाई किल्ला तळ्यात बुडून मृत्यू.. 

आते भाऊ व मामे भावाचा अंकाई किल्ला तळ्यात बुडून मृत्यू.. 

Ate Bhau and Mame Bhau drowned in Ankai Fort lake..

 कोपरगाव शहरात शोककळा Mourning in Kopargaon town

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 17 Aug, 18.30
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यावरील पर्यटनासाठी गेलेल्या कोपरगावच्या दोन युवकांचा तळ्यामध्ये बुडून  बुडून दुर्दैवी मृत्यू असल्याची घटना दुपारी अडीच वाजे दरम्यान घडली.

मिलिंद जाधव व रोहित राठोड अशी तरुण मृत युवकांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी, शहरातील सुमारे दहा ते पंधरा युवक नाशिक जिल्ह्यातील अंकाई येथील अंकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी 16 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास देव दर्शनासाठी गेले होते.
यावेळी तेथे असलेल्या तळ्यात मिलिंद राजू जाधव (२७) राहणार गोरोबानगर जवळ व त्याचा आतेभाऊ  रोहित राठोड  (१७) राहणार सुभाष नगर कोपरगाव यांचा तळ्यात बुडून अकस्मात मृत्यू झाला आहे त्यांच्याबरोबर अजून 8 ते 10 मित्र असल्याची माहिती मिळत आहे. 
प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेले नुसार मिलिंद राजू जाधव यांचा पाय घसरून तो तळ्यात पडला त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याचा आत्येभाऊ रोहित राठोड यांचा देखील तोल जाऊन दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.त्यावेळी तातडीने मित्र परिवार यांनी कोपरगावचे येथे फोन करून ही घटना कळवली. ताबडतोब तेथील नगर सेवक लोकप्रतिनिधी हाजी अल्ताफ कुरेशी, कलीम भाई शेख, सागर विसपुते ,विजय मोरे, शिवा सातोटे, गणेश शिंदे मंगेश मरसाळे अंकुश मोरे, अर्जुन मरसाळे, आकाश साटोटे, इम्रान बागवान, आसिफ शेख आदी तातडीने अंकाई व येवले येथे मदतीसाठी दाखल झाले. त्याआधी किल्ल्यावर असलेल्या काही तरुणांनी याची माहिती मिळताच त्यांनी केलेल्या पायथ्याशी असलेल्या अंकाई गावातील नागरिकांना याची माहिती दिल्यानंतर त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले अंकाई येतील रितेश परदेशी यांच्यासह रवींद्र अहिरे अक्षय वैद्य सोनवणे राहुल अहिरे लखन व्यापारे गुड्डू पठाण श्रीराम सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी तळ्यातून दोन्ही मृतदेह शोधण्यापासून थेट किल्ल्यावरून पायथ्याशी आणण्याचे काम केले. त्या दोघांचे मृतदेह येवला येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आले त्यानंतर रात्री कोपरगाव मृतदेह आणल्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेमुळे  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page