संजीवनीच्या १४ विद्यार्थ्यांची चार नामांकित नोकऱ्यांसाठी  निवड-  अमित कोल्हे

संजीवनीच्या १४ विद्यार्थ्यांची चार नामांकित नोकऱ्यांसाठी  निवड-  अमित कोल्हे

    Selection of 14 students of Sanjivani for four named jobs- Amit Kolhe

 Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 19 Aug, 14.00
By
राजेंद्र सालकर               

कोपरगांव: संजीवनी  अभियांत्रिकीच्या १४ विद्यार्थ्यांची   वेगवेगवेगळ्या  क्षेत्रातील आघाडीच्या  थर्मोफिशर सायंटीफिक, माईंडट्री, असेंचर व नॅश  इंडस्ट्रीज या चार कंपन्यांमध्ये आकर्षक पगारावर निवड झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याची माहिती संजीवनी इन्स्टिट्यूट चे मॅनेजिंग ट्रस्ट अमित कोल्हे यांनी दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की, संजीवनी अभियांत्रिकीत पहिल्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांना उद्योग जगताला अभिप्रेत असलेले  आधुनिक तंत्रज्ञान तुम्ही यावर भर दिला जातो  शिकवून यावर भर दिला जातो  त्यामुळेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर निवड होत आहे   अलिकडेच थर्मोफिशर सायंटिफिक या बायोमेडीकल व साॅफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  कंपनीने वैभव नामदेव दारूंटे, सुबोध संजय जाधव, पुणम दिलीप सांगळे व ऋतुजा शिवाजी  औटी या चार विद्यार्थ्यांची  निवड केली आहे. जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात  आधुनिक तंत्रज्ञान व सल्ला सेवा पुरविणाऱ्या  माईंडट्री या कंपनीने अस्मा बनेखा फकिर, शुभम  माणिकराव चव्हाण व सचिन बाल्मिक धट या तीन  विद्यार्थ्यांची   निवड केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या असेंचर या कंपनीने रोशन सोपान जाधव, पुनम दिलीप सांगळे व  दुष्यंत प्रमोद जाधव या तीघांची निवड केली आहे. यंत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील  विविध मशिनरींचे उत्पादन करणाऱ्या  नॅश  इंडस्ट्रीज या कंपनीने निकीता विलास नागरे, रेणुका एकनाथ सोनवणे, आकाश  आण्णासाहेब मतसागर व राहुल राजु मोरे या चौघांची  निवड केली आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीनंतर पालकांनी आमच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती झाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
  विद्यार्थ्यांच्या  नोकरीसाठी होणाऱ्या निवडी   याच खऱ्या अर्थाने माजी मंत्री कै. शंकरराव  कोल्हे यांना  आदरांजली ठरत असल्याची प्रतिक्रिया संजीवनी  इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितीन कोल्हे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचे  नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी अभिनंदन केले असुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची सर्व टीम व विभाग प्रमुखांचेही अभिनंदन केले.  
…………………..
विद्यार्थ्यांच्या    प्रतिक्रिया
   ‘मी नेवासा तालुक्यातील वाटापुर या साध्या खेडेगावातील शेतकऱ्याची  मुलगी आहे. आमच्या कुटूंबातील नोकरीसाठी बाहेर पडणारी मी पहिली मुलगी आहे. अगदी पहिल्या वर्षापासून  मुलाखतीचे तंत्र, देहबोली, व्यक्तीमत्व विकास या सर्व बाबींची रूजवण आमच्याकडून करून घेण्यात आली. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने आमच्याकडून मुलाखतींचा सराव करून घेतला. त्यामुूळेच थर्मोफिशर कंपनीच्या सर्व कसोट्या  पुर्ण करू शकले व माझी या कंपनीने निवड करून सुरूवातीलाच वार्षिक  पॅकेज रू ८. ५ लाख दिले. माझ्या जीवनातील हा सर्वोच्च आनंद असुन माझ्या शेतकरी  आई वडीलांचे स्वप्न मी पुर्ण करू शकले, हे केवळ संजीवनमुळेच.’-ऋतुजा औटी.
…….
     ‘मी नाशिक जिल्ह्यातील  येवला येथील रहिवासी असुन माझ्या अनेक मित्रांना पुण्याचे  आकर्षण  होते, परंतु माझे वडील सरकारी बॅन्केत नोकरीला असल्याने त्यांना संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन शिक्षण  घेतल्यास नोकरी हमखास मिळते हे माहित होते व त्यांनी मला संजीवनी मध्येच दाखल केले. मागील चार वर्षात  आमच्याकडून खुप टेक्नीकल बाबींचा सराव करून घेण्यात आला. विशेष  म्हणजे शेवटच्या वर्षात  जो प्रोजेक्ट करायचा असतो तो आपल्याला नोकरी मिळविण्यासाठी उपयोगी पडला पाहीजे, अशा  पध्दतीने येथे प्रोजेक्ट करण्यास प्रोत्साहीत केल्या जाते. माझा प्रोजेक्ट आयओटी बेस्ड असल्याने माझी माईंडट्री मध्ये निवड होण्यास खुप मदत झाली. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने आमच्या घेतलेले श्रम मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.’-शुभम  चव्हाण.    

Leave a Reply

You cannot copy content of this page