पालखेड डावा कालवा ; चाऱ्यांची दुरुस्ती व सीडीवर्क करावे – विवेक कोल्हे
Palkhed Left Canal; Repair and CD work of the fodder should be done – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 19 Aug, 17.00
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांष गावे हे बाराही महिने दुष्काळी असतात त्यांना पालखेड डाव्या कालव्याच्या पाण्याचा नियमित उपयोग होतो, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने याभागाकडे लक्ष देवुन त्यांच्या समस्यांची सोडवणूक केलेली आहे. पालखेड डाव्या कालव्याअंतर्गत वितरीका चारी क्रमांक ४२ ते ५२ यांची वहनक्षमता घटली असुन त्यांचे अनेकठिकाणी सीडी वर्क बांधकामे तुटल्याने शेतकरी लाभार्थ्यांना पाणी घेताना अडचणी तयार होतात तेंव्हा त्याची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पालखेडचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शुकवारी पूर्वभागातील लाभार्थी शेतक-यांच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष विवेक कोल्हे यांची भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.
या शिष्टमंडळात सर्वश्री. केशवराव भवर, बबनराव निकम, अंबादास पाटोळे, उत्तमराव चरमळ, रवींद्र देशमुख, विकास निकम, दत्तात्रय निकम, नानासाहेब निकम, दादाभाऊ सुबे, पिराजी शिंदे, शिवाजी भगुरे, रावसाहेब जाधव, अशोक शिंदे, शिवाजी जाधव, मनोज तुपे, प्रकाश शिंदे, किसनराव गव्हाळे, भानुदास मांडवडे, संतोष भागवत, रवींद्र पोळ, सुदामराव कर्पे, गणेश शिंदे, ज्ञानदेव भागवत, दादाभाऊ शिंदे, विनोद शेटे, अनिल मलिक, रामदास निकम, ज्ञानेश्वर निकम यांच्यासह शेतकरी लाभधारक मोठया संख्येने उपस्थित होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, पालखेड डाव्या कालव्याअंतर्गत कोपरगांवच्या पूर्व भागासाठी चारी क्रमांक ४२ ते ५२ हया अत्यंत महत्वाच्या असुन त्यातुन कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने व उपअभियंता संभाजी पाटील यांनी हे सर्व बंधारे ७५ टक्के भरून देण्यांसाठी विशेष सहकार्य केले त्याबददल त्यांचे आभार मानुन उर्वरित २५ टक्के बंधारे रिकामे असुन तेही तातडीने भरून देण्यात यावे जेणेकरून या भागातील रहिवासी नागरिक व जनावरांच्या पिण्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटून शासनाच्या टँकर खर्चात बचत होते असेही ते म्हणाले. शिरसगांव बंधा-यात पालखेडचे पाणी घेतांना अडचनी येतात तेंव्हा याठिकाणी तातडीने गेटचे काम करण्यात यावे असेही ते शेवटी म्हणाले.





