तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रशासकीय मान्यता द्या- ना काळे
Give administrative approval to Telwani Primary Health Centre- Na Kale
आशा सेविकांचे थकलेले वेतन द्याPay arrears of Asha Sevak
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 22 Aug, 18.40
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने प्रशासकीय मान्यता द्या अशी मागणी ना. आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
ना. काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव ग्रामीण रुग्णालय २० किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे तातडीने उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तिळवणीसह कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव आदी गावांसह वैजापूर तालुक्यातील नजीकच्या गावातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे. आता मंत्रालय स्तरावर मान्यता मिळणे आवश्यक असून लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता द्यावी. तसेच मागील ४ महिन्यांपासून आशा सेविकांना थकलेले वेतन तातडीने देण्यात यावे अशी मागणी ना.आशुतोष काळे दिलेल्या निवेदनात केली आहे. या मागण्यांना आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊव लवकरच प्रशासकीय मान्यता देण्याची ग्वाही ना. आशुतोष काळे यांना दिली आहे.
Post Views:
211