कोळ नदीवरील बंधारे भरले ग्रामस्थांकडून ना. काळे यांचे आभार
The dams on the Kol river were filled by the villagers. Thanks to Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 24Aug, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील पूर्व भागातील आपेगाव, शिरसगाव, सावळगाव, उक्कडगाव, तिळवणी, कासली, गोधेगाव, घोयेगाव या भागातील कोळ नदीवरील सर्व बंधारे ना.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पालखेड डाव्या कालव्याच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून भरले गेले आहेत.त्यामुळे वरील सर्व गावातील नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी ना.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
यावर्षी पावसाळ्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काही भागात समाधानकारक पर्जन्यमान असले तरी पूर्व भागातील काही गावात पुरेसे पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात देखील या गावातील कोळ नदीवरील बंधारे भरले गेले नव्हते.याची दखल घेऊन ना.आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता तसेच पालखेड डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता तसेच येवला उपविभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पालखेड डाव्या कालव्याच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोळ नदीवर असणारे सर्व बंधारे भरून द्यावे अशी मागणी करून याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्या मागणीला सर्व अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालखेडच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोळ नदीवरील सर्व बंधारे भरण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्याप्रमाणे ना.आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या आवर्तनाबाबत आग्रही भूमिका घेऊन सर्व लाभधारक शेतकऱ्यांना गोदावरी कालव्याच्या आवर्तनाचा लाभ मिळवून दिला आहे. त्याप्रमाणे पूर्व भागातील आपेगाव, शिरसगाव, सावळगाव, उक्कडगाव, तिळवणी, कासली, गोधेगाव, घोयेगाव या गावातील कोळ नदीवरील बंधारे भरून देण्यासाठी देखील पुढाकार घेतल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच ना.आशुतोष काळे यांचे पोपट भुजाडे, रामभाऊ खिलारी, कृष्णा मलिक, सुनिल मलिक, प्रविण चौधरी,राहुल गायकवाड, अशोक उकिर्डे, भाऊसाहेब उकिर्डे,चंद्रकांत गायके,नानासाहेब गायके,पोपट शिंदे,संदीप शिंदे,अशोक भोकरे,प्रकाश शिंदे,राजु माने, सुदामराव माने,आप्पासाहेब निकम, नानासाहेब निकम, रविंद्र निकम यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहे.
–
Post Views:
170