कर्मवीर शंकराव काळे कारखान्यावर गणेशोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम 

कर्मवीर शंकराव काळे कारखान्यावर गणेशोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

Various religious and cultural programs on Ganeshotsav at Karmaveer Shankarao Kale Factory

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 26 Aug, 17.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर गणेशोत्सवानिमित्त मा.आ.अशोक काळे व ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोसाका सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने गणेश चौक गौतमनगर याठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले असून मंडळाचे हे ६८ वे वर्ष आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे. बुधवार (दि.३१) रोजी सकाळी १० वाजता कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.संजीवनी कोल्हे यांच्या हस्ते श्रींची स्थापना करण्यात येणार आहे.सायंकाळी रात्री सात ते नऊ या वेळात रामायणाचार्य विदर्भ रत्न  ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार (दि.१)सप्टेंबर रोजी रात्री रात्री ८ ते १० या वेळेत झी टॉकीज फिल्म ह.भ.प. कु. मुक्ताई महाराज चाळक, पुणे व ह.भ.प. कु. उन्नतीताई महाराज तांबे नाशिक यांचे जुगलबंदी जाहीर हरिकीर्तन होणार आहे.शुक्रवार (दि.२)रोजी रात्री ८ ते १० या वेळेत भाग्यश्री प्रोडक्शन निर्मित आईटम गर्ल सोनी सोलापूरकर व लावणी सम्राज्ञी पल्लवी जाधव यांचा लावण्यखणी कार्यक्रम, शनिवार (दि.३)रोजी रात्री ८ ते १०  भारुड सम्राट ह.भ.प. भानुदास महाराज बैरागी व त्यांचे सहकारी यांचा भारुड कार्यक्रम, रविवार (दि.४) रोजी चंद्रकला व अर्चना थिएटर्स मुंबई निर्मित धमाल विनोदी नाटक ‘चल लव कर’,सोमवार (दि.५) रोजी सकाळी ११  वाजता कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे.रात्री रात्री ८ ते १० श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व स्वाध्याय परिवार गौतम नगर सेवेकरी महिलांचे श्री गणपती अथर्वशीर्ष (२१वेळा) सामुदायिक पठण, मंगळवार (दि.६) रोजी रात्री ८ ते १०  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे पुणे यांचे ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.बुधवार (दि.७) रोजी रात्री ८ ते १०  श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,राधाबाई काळे कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतमनगर या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे, गुरूवार (दि.८) रोजी रात्री ८ ते १०  कारखाना परिसरातील सर्व भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे,सोमवार (दि.९) रोजी सायंकाळी ४ ते ८ यावेळेत “श्री” ची भव्य मिरवणूक व विसर्जन करण्यात येणार आहे. तरी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा कारखाना परिसर व पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोसाका सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page