साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालय; युपीएसचा स्फोट रूग्णांच्या जीवाशी खेळ- – सौ. स्नेहलता कोल्हे 

साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालय; युपीएसचा स्फोट रूग्णांच्या जीवाशी खेळ- – सौ. स्नेहलता कोल्हे

Saibaba Superspeciality Hospital; UPS explosion plays with patient’s life- – Mrs. Snehlata Kohle

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 25 Aug, 19.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत सुपरस्पेशालिटी रुग्णालय असुन येथील दुस-या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील सीआरयु वन युनीट मध्ये २१ ऑगस्ट रोजी युपीएसचा स्फोट झाल्याची घटना घडली ती निंदनीय असून रुग्णाच्या जीवाशी खेळ असल्याचे मत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता  कोल्हे यांनी व्यक्त केले.

 साईबाबा मंदिर आणि शिर्डी परिसर देश विदेशातील भक्तगणांसाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण असुन या आंतरराष्ट्रीय तीर्थस्थळावर रुग्णालयात अशी घटना घडावी ही बाब न पटणारी आहे, तेंव्हा कार्यकारी अधिका-यांनी संस्थान अंतर्गत सर्व विभागांचे, रूग्णालयाचे, अतिदक्षता विभागाचे विद्युत व अन्य सुरक्षा सह सर्व विभागाचे आगप्रतिबंधक ऑडीट करून घ्यावे असेही सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या. 
          सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, साईबाबा संस्थान विश्वस्थ अंतर्गत साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात शिर्डी परिसरासह महाराष्ट्र राज्य व अन्य राज्यातील शेकडो रुग्ण दैनंदिन उपचार घेत असतात. मात्र २१ ऑगस्ट रोजी या रुग्णालयातील दुस-या मजल्यावर सीआरयु वन युनीट अतिदक्षता विभागात हृदयविकार, अँजोग्राफी, बायपास व अन्य शस्त्रकियेचे १९ रूग्ण उपचार घेत होते. या अतिदक्षता विभागातील बॅटरी ओव्हरचार्ज झाल्याने युपीएसचा मोठा स्फोट झाला. येथील सर्व रुग्ण तातडीने बाहेर पडल्याने विपरीत घटना घडली नाही, जीवीतहानी झाली नाही पण येथे सर्व काटेकोर काळजी घेतली जात असतांनाही अशा घटना घडणे म्हणजे रूग्णांच्या जीवाशी खेळ आहे. साईबाबांच्या शिर्डीत दिवसेंदिवस भाविकांची वर्दळ वाढत आहे. या घटनेमुळे विद्युत, आगप्रतिबंधक सुरक्षेसह अन्य सुरक्षा यंत्रणाही चौकशीच्या रडारवर आल्या आहेत. साईभक्तासह अन्य मोठ मोठया व्यक्तींच्या सुरक्षेतील छोटीशी चुकही महागात पडु शकते तेव्हा अशा घटना घडणार नाही याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page