मन की बात  लोकजागृतीसह सामाजिक जाणिवेची चळवळ – स्नेहलता कोल्हे 

मन की बात  लोकजागृतीसह सामाजिक जाणिवेची चळवळ – स्नेहलता कोल्हे 

Man Ki Baat Social awareness movement with public awareness – Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 26 Aug, 17.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव:  भारतीय जनता पक्ष जागतिक विचारधारेतून प्रथम क्रमांकावर असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून लोकजागृतीसह सामाजिक जाणिवेची चळवळ उभी करत असून येत्या २८ ऑगस्ट रोजीचे प्रसारणांत बुध, शक्ती, केंद्र प्रमुखांसह तळागाळातील प्रत्येक घटकाने त्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले. उत्तर महाराष्ट्रातील १४ हजार बूथ सशक्तीकरण केंद्रातून दीड लाख नागरिक मतदार म्हणजे मन की बात कार्यक्रमात सहभागी होतील असा प्राथमिक अंदाज आहे.

  तालुक्यातील आपेगांव येथे आदिवासी घटकासह दीन-दलित, अस्पसंख्यांक, बहुजन समाज बांधवांसह अंबादास पाटोळे वस्ती येथे वर मन की बात कार्यक्रमाबाबत तालुका संयोजक राजेंद्र औताडे यांनी प्रास्तविक केले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
           
 भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी राष्ट्रीय भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आगामी प्रमुख निवडणुकांसह स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडल्या गेलेल्या घटकांना पक्ष विचारधारेसह केंद्र व राज्य शासनाच्या योजना काय आहेत याची माहिती देऊन त्यातील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यiसाठी करावयाच्या कागदपत्र प्रस्तावाचे विवेचन केले. 
           
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागाच्या विकासात तळागाळातील घटक महत्वाचा आहे, त्याच्या समस्या काय आहेत ते जाणुन घ्या, त्या सोडवणुकीवर पक्ष पदाधिकाऱ्यासह बुथ, शक्ती, केंद्र प्रमुखांनी भर द्यावा, देशाच्या स्वातंत्र्य महोत्सवाला ७५ वर्षे पुर्ण झाले. राष्ट्राभिमान बाळगुन तिरंगा ध्वजाप्रती असलेली निष्ठा कायम ठेवावी. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची आठवण म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्री मंडळाने ७५ वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरीकांना एस.टी. प्रवास मोफत देण्यांची घोषणा करून त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल शासनाचे अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडण्यात आला.
           
याप्रसंगी अंबादास पाटोळे, शिवाजीराव जाधव, गोकुळ भुजाडे, मुकुंद भुजाडे, राहुल खिलारी, सचिन पाटोळे, विवेकनंद शिंदे, कृष्णा पाटोळे, योगेश पाटोळे, किरण गायकवाड, संतोष पगारे, अक्षय खिलारी, साईनाथ खीलारी ऋषिकेश भुजाडे, सागर भूजाडे, आसाराम पगारे, वसंत गायकवाड, राहूल गव्हाळे, मनोज गव्हाळे, महेश खिलारी, महेश गवारे, विनोद गोरे, अण्णासाहेब शिंदे, बाळासाहेब गव्हाळे, अशोक गव्हाळे, दादासाहेब सुंबे, ज्ञानदेव गायके, मनोज तुपे, पिराजी शिंदे, अशोक शिंदे, आनंदराव गायकवाड, ज्ञानदेव भागवत, लक्ष्मणराव वाघ यांच्यासह सर्व पक्ष पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी किसनराव गव्हाळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page