कोपरगावात केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांची संवाद बैठक- सौ स्नेहलता कोल्हे 

कोपरगावात केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांची संवाद बैठक- सौ स्नेहलता कोल्हे 

Union Minister Pralhad Singh Patel’s dialogue meeting in Kopargaon – Mrs. Snehalata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 10 Sep, 10.30 am
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव:  भारतीय जनता पार्टी उत्तर अहमदनगर जिल्हा संघटनात्मक बैठक अंतर्गत लोकसभा प्रवास योजनेच्या माहितीसाठी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष पदाधिकारी, बुथ व शक्ती केंद्र प्रमुखांसह कार्यकर्त्यांची संवाद बैठक कोपरगांव येथील कलश मंगल कार्यालयात शनिवार दि १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यांत आली असुन, सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने काही ठिकाणी कमकुवत बुथ असुन ती भरून काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल हे स्वत: हजर राहुन उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट महिन्यांत याबाबतचा आढावा घेवुन आवश्यक त्या सुचना केल्या आहेत. या बैठकीसाठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र विभाग क्लस्टरचे प्रभारी सुनिल कर्जतकर, सहप्रभारी उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे प्रभारी व चांदवड देवळाचे आमदार डॉ राहुल आहेर, लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक नितीन दिनकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित रहात आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रीमंडळाने कोरोना महामारीच्या आपत्ती काळात तळागाळातील ८० कोटी जनतेसह सर्व उपेक्षीतांना मोठी मदत केलेली आहे. देशाची एकसंघता अबाधीत राहून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्ष व विचारधारेला प्राधान्य देवुन मिशन २०२४ यशस्वीतेसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करावे असेही सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page