संजीवनी अभियांत्रिकीच्या आयटी विभागाची एनबीए मानांकनाची हॅट्रिक – अमित कोल्हे

संजीवनी अभियांत्रिकीच्या आयटी विभागाची एनबीए मानांकनाची हॅट्रिक – अमित कोल्हे

     IT department of Sanjeevani Engineering’s hat-trick of NBA ratings – Amit Kolhe

 आयटी विभाग दर्जा व गुणवत्तेवर  शिक्का मोर्तबThe IT department is a stamp on quality and quality

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 10 Sep, 13.30 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: भारत सरकारच्या नॅशनल बोर्ड ऑफ  ॲक्रिडीटेशन, नवी दिल्ली (एनबीए-राष्ट्रीय मान्यता मंडळ) यांनी संजीवनी अभियांत्रिकीच्या आयटी विभागास तिसऱ्यांदा एनडीए मानांकन दिल्याने आयटी विभागाची  एनबीए मानांकनाची हॅट्रिक झाली असून सलग सहा वर्षांचे मानांकन प्राप्त करणारे नगर नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय असल्याचे गौरव उद्गार मॅनेजिंग  ट्रस्टी अमित कोल्हे यांनी व्यक्त केले तरी या सर्वोच्च मानांकनामुळे आयटी विभागाच्या दर्जा व गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारत सरकारच्या स्वायत्त संस्थेने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीनुसार इन्फर्मेशन टेक्नालाॅजी (आयटी) विभागाने सादर केलेल्या कम्प्लायन्स रिपोर्टचे (अनुपालन अहवाल) मुल्यांकन करून अगोदर प्राप्त असलेल्या मानांकनाला  गृहीत धरून पुन्हा पुढील तीन वर्षांसाठी  एनबीए मानांकन जुन २०२५ पर्यंत दिले आहे. यापूर्वी महाविद्यालयाला २०१३ व २०१९ ला एन बी ए मानांकन प्राप्त झाले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फक्त चार आयटी विभागांना सलग सहा वर्षांचे  एनबीए मानांकन प्राप्त आहे. यात संजीवनीच्या आयटी विभागाचा समावेश  आहे, ही बाब ग्रामिण भागाच्या दृष्टीने  भुषणावह आहे. संजीवनी आयटी विभाग प्रवेश  क्षमता ६० वरून १२० करण्यात आली असून एम. टेक. (सायबर सिक्युरीटी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी   डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व आयटी विभाग प्रमुख डाॅ. माधुरी जावळे, सर्व प्राद्यापक व विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page