संजीवनीने दिलेल्या सॉफ्टवेअर स्कीलमुळे माझी निवड- वैष्णवी सदाफळ
My choice – Vaishnavi Sadafal due to the software skills provided by Sanjeevini
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 6 Sep, 17.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : मॅन एनर्जी या जहाजांसाठी डीझेल इंजिन बनविणारी बनविणाऱ्या कंपनीत संजीवनी अभियांत्रिकीतून मिळालेल्या सॉफ्टवेअर स्कीलमुळे माझी निवड झाली माझे स्वप्न पुर्ण झाले असल्याच्या भावना ईटीसी शाखेची विद्यार्थिनी राहाता येतील शेतकरी कन्या वैष्णवी सदाफळ व शुभम भवर यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केल्या.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत संजीवनीच्या २३ अभियंत्यांना मॅन एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. व फोर्स मोटर्स मध्ये आकर्षक पगारावर नोकऱ्या साठी निवड झाल्याची माहिती संजीवनी इन्स्टिट्यूट चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली प्लेसमेंट विभागाच्या बहारदार कामावर कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त केले
मॅन एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीने अक्षय नळे, निखिल निकाळे, शुभम भवर, सोहम केंगे, चैतन्य लोखंडे, भूषण मोरे, अनिकेत परजणे, प्रतिक पाटील, शंतनू झाल्टे, विनित बोकाडिया, आदर्शसिंग राजपुत व वैष्णवी सदाफळ यांची निवड केली आहे. फोर्स मोटर्स या कंपनीने पायल दहिफळे, नीता गडाख, शीतल कोल्हे, माधव चितळकर, संकेत दिघे, बापु गाडेकर, शुभम खंबायते, रोशन खंडारे, रविंद्र कोते, आदित्य रावळ व कुमार शम्मी यांची निवड केली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे , डायरेक्टर डॉ . ए. जी. ठाकूर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views:
362





