गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप – सौ स्नेहलता कोल्हे

गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप – सौ स्नेहलता कोल्हे

Free distribution of books to underprivileged students – Mrs. Snehalata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 10 Sep, 14.20 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव  : स्व. शंकरराव कोल्हे यांनी समाजिक  क्रांतीतून गोर-गरीबांचे कल्याण केले.आपल्या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारच्या सत्कार न स्वीकारता सर्व खर्चाला फाटा देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्याचा उपक्रम बिपिन कोल्हे यांनी गेल्या १३ वर्षापासून सुरू ठेवला असल्याचे गौरव उद्गार भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी चांदेकसारे येथील कार्यक्रमात व्यक्त केले

यावेळी सौ स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतील २५ लाख रुपयांच्या स्व. शंकरराव कोल्हे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण केले व संजीवनी उद्योग समुह, नीलवसंत फाउंडेशन, संजीवनी युवा प्रतिष्ठान व मणिशंकर आय हॉस्पीटल यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरातील रुग्णांना  मोफत चष्म्यांचे वाटप केले , अध्यक्षस्थानी माजी संचालक संजय होन होते. 
           प्रारंभी माजी सरपंच केशव होन यांनी प्रास्तविक केले, संचालक ज्ञानेश्वर होन यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.  
 चांदेकसारे ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या दोन वर्षात ३५ लाख ८४ हजार रुपये खर्चाच्या पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण तसेच ३३ लाख ८७ हजार रुपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ सौ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
                
           याप्रसंगी ह. भ. प. अंकुश महाराज जगताप, कोल्हे  कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक निवृत्ती बनकर, विश्वास महाले, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, बापुसाहेब बाराहाते, बाळासाहेब वक्ते, निलेश देवकर, शिवाजीराव वक्ते, अरुणराव येवले, अशोकराव औताडे, आप्पासाहेब औताडे, कामगार नेते मनोहर शिंदे, गणपत दवंगे, रावसाहेब होन, आप्पासाहेब होन, द्रोणाचार्य होन, प्रल्हाद पवार, दगुराव शेख, जालीदर चव्हाण, सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, प्रा. रामनाथ नन्नवरे, चंद्रकांत औताडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चांदेकसारे पंचक्रोशीत नागरीक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page