चुकीच्या सर्वेक्षणामुळे मालमत्ता कर वाढला; अवास्तव घरपट्टीला स्थगिती द्या- शिवसेना नगरसेवक
Inaccurate surveys increase property taxes; Put a moratorium on unreasonable housing – Shiv Sena corporator
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 13 Sep, 19.20 pm
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेने मागील वर्षभरात एस आर कस्ट्रक्शन नागपुर यांच्यामार्फत मालमत्तांचे सर्वेक्षण करून करांच्या पूनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही पूर्ण केली आहे़. पालिकेने निश्चित केलेल्या नवीन दरानुसार अवास्तव घरपट्टी आकारली आहे.चुकीच्या सर्वेक्षणामुळे मालमत्ता कर वाढला असून या अवास्तव घरपट्टीला स्थगिती द्या अशी मागणी येथील शिवसेना नगरसेवकांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे मंगळवारी (१३) रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
यापूर्वी या सर्वेक्षणाबाबत शिवसेना भाजप नगरसेवकांनी शेप घेतला होता परंतु दुर्दैवाने त्याची नगरपालिकेकडून दखल घेतली नाही.
मार्च २०२० पासून देशावर, राज्यावर आणि शहरावर कोरोना संकट होते. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक संकटात नागरिक सापडलेले आहेत. अजूनही यातून नागरिक पूर्णपणे सावरलेले नाहीत असे असताना बेजबाबदार सर्वेक्षण करून अवास्तव घरपट्टी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकात रोष आहे. त्याचा उद्रेक होऊ नये यासाठी अवास्तव घरपट्टी तातडीने स्थगित करावी, फेर सर्वेक्षण करावे, कोरोना संकटाचा विचार करता पूर्वीप्रमाणेच नागरिकांना घरपट्टी आकारून दिलासा द्यावा, तसेच अहमदनगर महानगरपालिकेप्रमाणे शास्ती माफ केला, त्याप्रमाणे आपणही शास्ती कर माफ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांच्या वतीने नगरपालिकेकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन शिवसेना नगरसेवक यांनी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना मंगळवारी त्यांच्या दालनात जाऊन दिले आहे या निवेदनावर नगरसेवक शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेना माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,शिवसेना नगरसेवक अतुल काले, नगरसेवक अनिल उर्फ कालूअप्पा आव्हाड, नगरसेविका ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई यांच्या सह्या आहेत.
Post Views:
256