गोदावरी नदीत नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून २५ हजार क्यूसेक्स वेगाने पाणी 

गोदावरी नदीत नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून २५ हजार क्यूसेक्स वेगाने पाणी               

25 thousand cusecs of water from Nandur Madhameshwar dam in Godavari river

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue20 Sep, 19.40 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव  : कोपरगावात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार  ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे ,आजही धुवाधार पाऊस झाला. सकाळपासून रिपरीप पाऊस सुरू होता, दुपारी एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे सोमवारच्या आठवडे बाजाराची दाणादाण झाली, शहरा नदी असलेला गोदावरी लहान पूल रहदारीसाठी व खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची जाण्याची मोठी तारांबळ झाली.

शहरातील रस्ते अनेक प्रभाग जलमय झाले होते. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान गोदावरी नदी पात्रात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून २५ हजार  क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते.        
 पाऊस आला इतका प्रचंड वेग होता की समोरचा मनुष्य दिसत नव्हता. पडलेल्या पावसामुळे गटारी रस्ते स्वच्छ धुऊन गेले. त्यामुळे आधीच हौस त्यात पडला पाऊस असेच म्हणण्याची वेळ कोपरगावकरांवर आली. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांनी आपली दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले. यावर्षी इतका मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याच जुने जाणकारांनी सांगितले. सखल भागात विविध प्रभागात पाण्याची लोंढे आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. काही प्रभागात गटारी तुंबल्याने त्यावरून ओसंडून पाणी वाहत होते.           
आतापर्यंत जिल्ह्यात ५१८.६ मि.मी मध्ये ११५.७ टक्के पाऊस 
पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
 भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात १९ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.  जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३५२७६ क्यूसेस व जायकवाडी धरणातून ८०१७२ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ३६८७४ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून १६१०० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून २०३२ क्युसेस, निळवंडे धरण ३५१४ क्यूसेस व ओझर बंधारा ८३२७ क्यूसेस, मुळा नदीत मुळा धरणातून ७००० क्यूसेस आणि कुकडी नदीत येडगाव धरणातून ७०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थ‍िती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
  जिल्ह्यात आजपर्यंत ५१८.६ मि.मी. (११५.७ %) पर्जन्यमान झालेले आहे.  वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अहमदनगर, पुणे व नाशिक जिल् हयातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरु असून अतिवृष्टी झाल्यास धरणाद्वारे सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे.
नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.  धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४/२२५६९४०  वर संपर्क साधावा. असे आवाहनही पल्लवी निर्मळ यांनी या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.      गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ-.          गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने सर्व छोटेमोठे नदी नाले भरून वाहत आहेत. धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे.
परीणामी गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ-होऊन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे .
पाणी पातळी वाढल्याने पुलाखाली असणारी पक्षांची घरटी वाहून गेल्याने पक्षी सैरभैर झाले आहेत.
 खबरदारीचा उपाय म्हणून गोदावरीनदी वरील लहान पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
 सततच्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ-होऊन सुरक्षिततेसाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी जलसेतु ,( लहान पुल ) प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. तरीही काही आगाऊ नागरिक ( मुली सुद्धा ) बांबूच्या वरून सायकल टाकून ये जा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दुर्घटना घडू नये यासाठी शासनाने प्रयत्न केला आहे जनतेने सहकार्य करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page