कोपरगाव आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून चुकीचा सर्व्हे ; मुख्याधिकारी यांची आमदारासमोर कबुली

कोपरगाव आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून चुकीचा सर्व्हे ; मुख्याधिकारी यांची आमदारासमोर कबुली

Kopargaon R. S. Incorrect survey by construction company; Mukhadhikari confession before MLA

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir.23 Sep, 18.30 pm
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेने २०१६ साली निर्णय घेवून आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला मालमत्ता सर्वेक्षणाचे काम दिले होते. तपासांती त्या कंपनीकडून सर्व्हेत चूका झाल्या असल्याची कबुली नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शुक्रवारी आमदार आशुतोष काळे यांच्या आढावा बैठकीत दिली अशी माहिती आमदार काळे यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे .

मागील आठवड्यात आ. आशुतोष काळे यांनी नगरपरिषदेने अवास्तव करवाढ केल्यामुळे या कर वाढीबाबत हरकती असलेल्या नागरिकांशी चर्चा करून मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत
नगरपरिषदेने केलेल्या अवास्तव करवाढी संदर्भात बहुसंख्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत नगरपरिषदेने योग्य ती कार्यवाही करून हरकती असलेल्या नागरिकांचे मालमत्ता कर कमी करावेत तसेच मालमत्तांचे फेर सर्वेक्षण देखील करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या होत्या. त्याबाबत नगरपरिषदेने आठ दिवसात काय कार्यवाही केली याची माहिती शुक्रवार (दि.२३) रोजी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडून साईबाबा तपोभूमी या ठिकाणी झालेल्या बैठकीत जाणून घेतली. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी महत्वाचा खुलासा करतांना सांगितले की, आपल्या  सूचनेनुसार वाढीव कर वाढीबाबत ज्या नागरिकांच्या हरकती आल्या त्या नागरिकांच्या मालमत्तेचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने तयारी केली आहे.  आर एस कन्स्ट्रक्शन कंपनीचा झालेला अहवाल तपासला असता या सर्व्हेत चूका झाल्या असल्याचे देखील त्यांनी मान्य केले आहे.त्यामुळे झालेल्या चुका दुरुस्त करून या नागरिकांची वाढीव करवाढ नक्कीच कमी होईल असा दिलासा देतांना सर्वच मालमत्तांचे  खुलासा  करताना  झालेली करवाढ कमी करण्याबाबतचे प्रस्ताव सबंधित कमिटीकडे पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आ. आशुतोष काळे यांच्या खंबीर भूमिकेमुळे  सर्व नागरिकांना  मोठा दिलासा मिळणार आहे. 
 
यावेळी बैठकीसाठी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पाणी पुरवठा अभियंता ऋतुजा पाटील, पद्माकांत कुदळे, धरमचंद बागरेचा, जिल्हा कार्याध्यक्ष  संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले,  काळे कारखाना संचालक दिनार कुदळे,  मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीरमहंमद कुरेशी, दिनकर खरे,  सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार  आदीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page