कोपरगाव शहरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

कोपरगाव शहरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

A grand blood donation camp was held in Kopargaon.

काका कोयटे यांचा वाढदिवस ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.71 blood donors donated blood on Kaka Koyte’s birthday.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun.25 Sep, 17.50 pm
By

कोपरगाव : कोपरगाव शहरात विविध संघटनांच्या माध्यमातून  रक्तदान हे गरजवंतासाठी अमृता सारखे असते. या सामाजिक दायित्वामुळे ‘रक्तदान करूया, एखाद्याला नवीन आयुष्य देऊया’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 येथिल   समता  पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर पार पडले. शिबिराचे उद्घाटन ७८ वेळा रक्तदान करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे समता पतसंस्थेचे संचालक निरव रावलिया यांच्या हस्ते करण्यात आले 
यावेळी, परेश उदावंत, संदीप कोयटे, सुमित सिनगर अजित लोहाडे, .सुधीर डागा, गुलशन होडे, राजकुमार बंब, अरविंद भन्साळी, संदीप रोहमारे,  दिपक अग्रवाल राजेंद्र शिरोडे,समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड आदी उपस्थित होते.
    रक्तदान शिबीरासाठी समता रक्तपेढी, नाशिक, समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगावचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कोपरगाव व राहता  लिंगायत संघर्ष समितीचे, पदाधिकारी,सदस्य आदींनी विशेष परिश्रम घेतले.  सुत्रसंचालन व आभार कोपरगाव लिंगायत संघर्ष समितीचे  प्रदीप साखरे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page