सावकारी पाशातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी सोसायट्यांची स्थापना नितीन औताडे

सावकारी पाशातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी सोसायट्यांची स्थापना नितीन औताडे

Nitin Autade set up societies 2 free farmers from moneylenders’ trap

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun.25 Sep, 17.40 pm
By

कोपरगांव :  विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे नगर जिल्ह्यात सहकाराची चळवळ सर्वप्रथम पोहेगावला उभी राहिली.सहकाराचे महामेरू म्हणून श्री ग र औताडे पाटील यांची ओळख आहे. सावकारी पाशातून शेतकऱ्यांना सोडण्यासाठी अनेक सहकारी सोसायट्या स्थापना झाल्या असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नितीन औताडे यांनी पोहेगांव बुद्रुक नंबर २ विकास सोसायटीच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले

नितीन औताडे पुढे म्हणाले की, सन १९६९ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्व.चांगदेवअण्णा औताडे यांनी पोहेगांव बुद्रुक नंबर २ विकास सोसायटीची स्थापना केली. आज संस्था आर्थिक भरभराटीला आली असून गरजेचे वेळी सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो यामुळे विकासाला चालना मिळते. स्वतःचे व्यापारी संकुल व इतर विधायक कामामुळे  सोसायटीची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे  असे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक वाके, संचालक दिलीप औताडे ,अनिल औताडे , सुनिल बोठे , संजय औताडे , कैलास औताडे , अनिल औताडे , सुनिल हाडके, गोकुळ लांडगे ,सोमनाथ सोनवणे , नितीन भालेराव ,प्रदीप औताडे, राजेंद्र औताडे,गोरक्षनाथ जोंधळे अदी सह सभासद उपस्थित होते. सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे सचिव गोरक्षनाथ फटांगरे यांनी केले.
चालू आर्थिक वर्षात संस्थेला १ लाख १५ हजार रुपये इतका नफा झाला असून संस्थेने विकासाच्या दृष्टीने व्यापारी संकुलनाचीही उभारणी केली आहे. नवीन व्यापारी संकुलनाचेही काम प्रगतीपथावर आहे.
संस्थेने बँक पातळीवर शंभर टक्के वसूल दिला असल्याने संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे यांनी सांगितले.दिवाळीनिमित्त संस्था सभासदांना विशेष भेट देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
सूत्रसंचालन सचिव गोरक्षनाथ फटांगरे यांनी केले तर आभार दिलीपराव औताडे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page