केंद्र सरकारने साखरेची दुहेरी किंमत धोरण अवलंबले पाहिजे : विवेक कोल्हे 

केंद्र सरकारने साखरेची दुहेरी किंमत धोरण अवलंबले पाहिजे : विवेक कोल्हे 

Central government should adopt dual price policy for sugar: Vivek Kolhe

कोल्हे  कारखाना दहा लाख मेट्रिक टनांचे गाळप करणारThe Kolhe factory will refine one million metric tonnes

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon.26 Sep, 18.00 pm
By

कोपरगाव : साखरेच्या एकूण वापरात ३० टक्के वापर घरगुती कारणासाठी, तर ७० टक्के औद्योगिक क्षेत्रासाठी वापरली जाते. औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या साखरेचा दर घरगुती साखर दरापेक्षा जास्त ठेवावा, जेणेकरून कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. साखरेचा किमान दर जो ठरवण्यात येईल, तो उसाच्या वैधानिक किमतीशी निगडित असावा; त्यामुळे एफआरपीत वाढ झाल्यास साखर दरातही वाढ होईल. अशी मागणी कोल्हे सरकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सोमवारी (दि २६) रोजी कारखान्याच्या ६० व्या वार्षिक सभेत केली.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे  सहकारी साखर कारखान्याची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सभेस कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, व्हाईस चेअरमन शंकर घोडेराव दत्तू नाना कोल्हे संजीवनी इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे तसेच सर्व विदयमान संचालक मंडळ उपस्थित होते.

प्रतिमा पूजन :

सभा सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे  यांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन विवेक कोल्हे बिपिन कोल्हे व व संचालक मंडळाने केले. 

श्रद्धांजली :

सर्व संचालक मंडळाचे वतीने अहवाल सालातील भारतातील थोर नेते, स्वातंञसेनानी, संशोधक, शास्ञज्ञ, लेखक, साहित्यिक, जवान, कलावंत, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, कारखान्याचे सभासद, हितचिंतक, कर्मचारी दिवंगत झाले त्यांच्या  मृतात्म्यास चिरशांती व सदगती लाभो अशी कारखान्याचे संचालक मंडळ. सभासद, अधिकारी कर्मचारी व कामगार बंधूभगिनी यांचे वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करणेत आली.
      माजी मंत्री स्व.  शंकरराव कोल्हे यांच्या विकासात्मक कार्याचा आढावा शिवाजीराव वक्ते यांनी घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 
          शरद पोपटराव शिंदे आडसाली (शहा सिन्नर), बाळासाहेब माधवराव संधान पूर्व हंगामी (दहिवडी सिन्नर), पुंडलिक आनंदा गिते सुरू (संवत्सर), व एकनाथ कचरू गवांदे खोडवा (लक्ष्मणपुर सिन्नर), या सर्वाधिक उस उत्पादन घेणा-या शेतक-यांचा सत्कार करण्यांत आला. उपाध्यक्ष रमेश घोडेराव सर्व संचालक व कार्यकारी संचालक यांनी सभासदांचे स्वागत केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले. मागील सभेचे इतिवृत सचिव तुळशीराम कानवडे यांनी वाचले त्यास सभासदांनी मंजुरी दिली.

  विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे पहिले सहकारमंञी अमित शहा यांनी एफ आर पी रकमेत वाढ केल्याबद्दल सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केले 

यावेळी केंद्र सरकारकडे मागणी करताना विवेक कोल्हे म्हणाले

इथेनॉल धोरण :

सध्याचे केंद्र सरकारचे इथेनॉल धोरण कारखानदारीस अनुकूल आहे; सध्या  इथेनॉलसाठी  दर  साखरेच्या किमान विक्री दराशी  निगडित आहे. त्यामुळे किमान साखर दरात वाढ झाल्यास, थेट  इथेनॉल दरात देखील वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे अतिरिक्त साखर इथेनॉलकडे रूपांतरित केली जाईल आणि साखरेचे दर स्थिर राहण्यास कायमस्वरूपी मदत होईल.

साखर निर्यात :

मागील वर्षी मोदी सरकारने निर्यातीस परवानगी दिल्यामुळे कारखानदारीला मोठा फायदा झाला जोपर्यंत अतिरिक्त साखर साठ्याचा प्रश्न भेडसावत आहे, तोपर्यंत पुढील काळासाठी सध्याचे निर्यात धोरण चालू ठेवावे. तसेच गरजेनुसार रिफाइंड शुगर तयार करावी लागेल. साखरेचे अतिरिक्त उत्पादन टाळून, साखर व इथेलॉन यांचे समतोल उत्पादन साधणे गरजेचे. भविष्यात सहवीज निर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेला चांगला पैसा मिळाला. 

यंत्रसामुग्रीसाठी अनुदान :

ऊसतोडणी प्रमाणेच साखर कारखान्यांना नवीन तंत्रज्ञान व यंत्रसामुग्रीसाठी  केंद्र सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी केली
राज्यात सहकारी एवढेच खासगी साखर कारखाने आहेत त्यांच्यातआज खाजगी आणि सहकारी कारखादारीत स्पर्धा सुरू झाली आहे सध्या सहकारी साखर कारखानदारीतील नोकर पगार, हा खासगी कारखानदारी पेक्षा दुपटीने जास्त आहे.  
  महाराष्ट्रातील साखर कारखानदारी सुरक्षित राहण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांची मदत असेल तरच भविष्यात साखर कारखानदारी टिकेल.
विवेक कोल्हे म्हणाले, आज पर्यंत कोल्हे कारखान्याने कोणाही पेक्षा शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना एक रुपयाही कमी दिलेला नाही फरक एवढाच की आम्ही बोलत नाही थेट पैसे खात्यात जमा करतो असा टोलाही त्यांनी लगावला.
स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सहकार तत्वाशी कधीही तडजोड केली नाही तात्कालीन सरकारच्या धोरणामुळे ११ उपपदार्थ प्रकल्प  पंधरा वर्षे बंद होते परंतु कोल्हे  साहेबांनी एकाही कामगाराला घरी पाठवले नाही परंतु तिकडे पेपर उद्योग बंद करून चारशे लोकांना एका रात्रीत घरी पाठवले असा टोलाही त्यांनी लगावला पाण्यासाठी कोल्हे साहेबांचा संघर्ष सर्वश्रुत आहे संजीवनीने संघर्ष पाहिला संकटे पाहिली तसेच सुवर्णकाळही पाहिला कोल्हे साहेब ही एक व्यक्ती नसून एक विचार आहे त्या विचारावर चालणार संचालकांच्या  आग्रहामुळे   तज्ञ संचालक झालो आता  माझ्यावर विश्वास टाकून मला चेअरमन पदाची जबाबदारी दिली ही सेवा करण्याची संधी मला दिली हे मी माझे भाग्य समजतो बिपिन दादांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षात अनेक पुरस्कार मला मिळवता आले पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत यावर मार्गक्रमण करीत असताना मागच्या राज्य सरकारच्या काळात काही अडचणी आल्या तरीही आमचे रासायनिक प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत येत्या काही वर्षात उसावरील कीड त्यावरील उपाययोजना, उसाची परिपक्वता वाढ व टनेज, आदि माहिती अत्याधुनिक सॅटेलाईट तंत्रज्ञानातुन ई कृषि ॲपच्या माध्यमांतुन सभासद शेतक-यांना उपलब्ध करून देवुन कोल्हे कारखाना राज्यातील पहिल्या दहा कारखान्यात असेल अशी असा आत्मविश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला
कोळपेवाडी कारखान्याचे चेअरमनपद काही काळ स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी भूषविलेले आहे असे असतानाही कारखान्याच्या चालू अहवालात त्यांचा श्रद्धांजली फोटो नाही अशी खंत व्यक्त केली स्वर्गीय शंकरराव काळे  यांना संजीवनी कारखान्याने श्रद्धांजली अर्पण करताना अहवालात स्वर्गीय  शंकरराव काळे यांचा फोटो छापला होता व कामगारांना एक दिवसाची सुट्टी घोषित केली होती असे सांगितले  तत्वाशी  कुणालाही तडजोड करू द्या  आम्ही मात्र तशी तडजोड करणार नाही  असा स्पष्ट इशारा  विवेक कोल्हे यांनी  दिला. 
जिरायत भागातील शेतक-यांना निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे मिळावे यासाठी भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे या मंत्रालयात बैठकीसाठी गेल्या असुन येत्या डिसेंबर जानेवारी पर्यंत शेतक-यांच्या शेतात पाणी पोहोचण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे असे विवेक कोल्हे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. 
लंम्पी आजार असलेल्या  जनावरांना लसीकरण करून घ्या तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून घ्या असे आवाहन त्यांनी  शेवटी केले.सुत्रसंचलन व आभार संचालक विश्वासराव महाले यांनी केले. 
चौकट 
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे सहकारी साखर कारखानदारीतील योगदान लक्षात घेवुन त्यांचा पुर्णाकृती पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात यावा अशी सुचना ऐनवेळच्या विषयात आप्पासाहेब औताडे व रमेश औताडे यांनी केली त्यास सर्व सभासदांनी हात उंचावुन संमती दिली.
चौकट 
सीएनजी निर्मितीवर भर देणारा असून सर्व प्रकल्प कसे सीएनजी वर करता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत तसेच येथे हंगामात  कोल्हे कारखाना दररोज सहा हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप करणार असून या हंगामात दहा लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले  आहे – विवेक कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page