तिढा कायम, चर्चा निष्फळ’   अवास्तव घरपट्टीच्या विरोधात साखळी उपोषण सुरू 

तिढा कायम, चर्चा निष्फळ’   अवास्तव घरपट्टीच्या विरोधात साखळी उपोषण सुरू 

Dissension continues, discussion is fruitless’ chain hunger strike against unreasonable housing

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue .27 Sep, 20.00 pm
By

कोपरगाव : भाजप सेना रिपाई (आठवले गट) यांच्या साखळी उपोषण  आंदोलनाच्या पहिल्या दिवशी नगरपालिका मुख्याधिकारी सोबतच्या  दोन ते अडीच तासांच्या  चर्चेत  कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. पालिकेसोबत  सुरू असलेली चर्चा शून्यावर आली आहे असा दावा पराग संधान व त्यांच्या आंदोलकांनी केला आहे.

मंगळवारी (दि२७)सकाळी नऊ वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात या साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे हे उपोषण रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती  भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रास्ताविक करताना दिली.
यावेळी मुख्याधिकारी व आंदोलन यांच्यात झालेल्या चर्चेत आर एस कंपनीने केलेला सर्वे चुकीचा असल्याचे मुख्याधिकारी व अधिकारी यांनी मान्य केले  यानंतर आंदोलकांनी  आरएस कंपनीला  ब्लॅक लिस्टमध्ये  टाकून  त्यांच्याकडून  कोपरगावच्या जनतेचे ६५ लाख रुपये वसूली करावी, सर्वे चुकीचा असल्याने लोकांना पाठविण्यात आलेल्या वसुलीच्या नोटिसी तातडीने रद्द कराव्यात जोपर्यंत नवीन सर्वे होत नाही तोपर्यंत  सन 2022 – 23 सालाची पट्टी सन 2020-21 प्रमाणे  घेण्यात यावी त्यावर कुठल्याही प्रकारची शास्ती लावण्यात येऊ नये. पण नंतरही याची वसुली करू नये तसेच सिल्लोड नगरपालिकेने सर्वे चुकीचा झाल्याकारणास्तव नोटीसा रद्द करून मागच्या प्रमाणे पट्टी आकारण्याचे मान्य केले आहे असे वृत्त टीव्हीवर प्रसिद्ध झाल्याचे सांगितले त्याच धर्तीवर येथील पट्ट्या रद्द कराव्यात व जुन्याप्रमाणेच पट्ट्या घेण्यात याव्यात तसेच यापुढे सर्वे करताना भांडवली तत्त्वावर न करता भाडेतत्त्वावर करण्यात यावा अशा मागण्या मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केल्या परंतु त्यांनी सर्वे चुकीचा असल्याचे मान्य केले परंतु दुसरीकडे नोटीसा रद्द करणे व पट्टी मागच्या प्रमाणे आकारण्यास   असमर्थता दर्शविली यासाठी मला लोकांच्या हरकती  बोलावून आयुक्त  कार्यालयाकडे  पाठवाव्या लागेल व त्यानंतरच निर्णय घेता येईल असे सांगितले.
यावेळी  पत्रकार यांनी मुख्याधिकारी यांना विचारले की, सर्वे जर चुकीचा आहे तर मग तुम्ही ठरावाप्रमाणे 25 किंवा 20%  पट्टी वाढ मागील घरपट्टीवर वाढ करणार की ?  सर्वे प्रमाणे वाढ करणार ? या प्रश्नांचे  मात्र ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. 
 यावेळी आंदोलकांनी  आमदार आशुतोष काळे यांच्या बैठकीत आपण  40% पर्यंत कायद्याने  पट्टी वाढ करण्यात  करता येते असे सांगितले व आमदारांनी ही ती वाढ मान्य केली असे  डिजिटल फलक गावात लागल्याचे   निदर्शनास आणून देताना  पराग संधान म्हणाले, जर सर्वे चुकीचा आहे  असे असतानाही  आमदार यांनी  40 टक्के वाढ कशी  मान्य केली ? हे मात्र आम्हाला कळू शकले नाही  त्यामुळे लोकांना अव्वाच्या  सव्वा पट्ट्या भराव्या लागणार आहेत  हे मात्र  श्रेयाच्या  नादात आमदार व त्यांच्या  कार्यकर्त्यांच्या लक्षात आले नसल्याचा टोला  त्यांनी  लगावला.
पराग संधान म्हणाले,  पण आमचे निवेदन आधीच्या तारखेचे असतानाही आम्हाला  बैठकीसाठी का बोलावले नाही ? आपण  कोणाला तरी राजकीय लाभ व्हावा यासाठी  भूमिका घेत आहात का ?  असं सवाल केला. आमचे पत्र आधी असताना नंतर आलेल्या पत्राला तुम्ही उत्तर दिले  ते पत्र व्हाट्सअप वर व्हायरल झाले याबाबत आपण काय सांगू शकाल ? यावर मात्र मुख्याधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांकडे बोट दाखविले व अंग झटकले.
जोपर्यंत मुख्याधिकारी हे मालमत्ता सर्वेक्षण करणाऱ्या आरएस  कंस्ट्रक्शन कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकत नाही, दिलेल्या चुकीच्या सर्वे त्यानुसार दिलेल्या वसुलीच्या नोटीस रद्द करत नाही,  सर्वे  कंपनीकडून  65 लाख रुपये वसूल करत नाही, फेरसर्वे चुकीचा झाल्यामुळे नवीन पट्टी आकारता येणार नाही,  त्यामुळे जुन्या मागील वर्षाप्रमाणेच पट्टी घेण्यात यावी या मागण्या जोपर्यंत मान्य  होत नाही व आपण तसे लेखी देत नाही तोपर्यंत आमचे उपोषण सुरू राहील असे संधान यांनी मुख्याधिकारी यांना सष्ट  सांगितले. यानंतर दोन अडीच तासापासून चाललेली चर्चा निष्फळ झाली व  तिढा कायम असल्याचे सांगत उपोषण सुरूच राहणार असल्याचे पराग संघाने यांनी जाहीर केले व शहरातील नागरिकांनी या उपोषणास पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.
 
यावेळी चर्चेत पराग संधान जितेंद्र रणशुर, योगेश बागुल, अकबरभाई, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई राजेंद्र सोनावणे कैलास जाधव, केशव भवर, सौ शिल्पा रोहमारे, विजय आढाव, संजय सातभाई, विनोद राक्षे, बबलू वाणी, विजय वाजे यांनी भाग घेतला. यावेळेस शिवसेना यावेळी भाजप शिवसेना रिपाई पक्षाचे आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 शहरातील वेगवेगळ्या स्थरातील अनेक नागरिकांनी व संघटनांनी या उपोषणाला जोरदार पाठिंबा दर्शविला आहे  पालिका प्रशासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास नागरिकांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता हे आंदोलन चांगलेच चिघळणार असल्याचे दिसते
सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यावेळी ते म्हणाले मुख्याधिकारी गोसावी यांची भूमिका  संशयास्पद असून ते लोकप्रतिनिधीचे व एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करीत असल्याचे दिसून येत आहे हे योग्य नाही नगरपालिकेत जाऊन गेल्या वर्ष दीड वर्षातील  कामांचा आढावा घेऊन पोलखोल करावीच लागेल असा सज्जड इशारा त्यांनी दिला.  नगरपालिकेने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करावे लागेल प्रसंगी ग्रामसभा घेऊन याचा निर्णय जनतेच्या दरबारातच लावावा लागेल असा इशारा दिला.

Leave a Reply

You cannot copy content of this page