कोपरगावात खळबळ; नवरात्रीच्या उपवासानिमित्त भगरीच्या पिठाचे पदार्थ खाल्याने तीन जणांना विषबाधा
Excitement in Kopargaon; Three persons poisoned after consuming Bhagri flour food on the occasion of Navratri fasting
अन्न व औषध प्रशासनाकडून गंभीर दखल जोरदार कारवाईSerious action taken by Food and Drug Administration
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed .28 Sep, 16.00 pm
By
By
कोपरगाव :नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी १०० पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. कोपरगाव शहरात पॅकिंग केलेल्या भगरीच्या पिठापासून बनविलेले पदार्थ खाल्याने तीन जणांना विषबाधा झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे सध्या सर्व रुग्णांवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे
शहरातील धरम कानकुबजी यांनी बाजारातुन बंद पाकीट मधील भगरचे पिठ आणून त्याचे बनवलेले पदार्थ खाताच त्याच्यासह त्याची पत्नी व मुलीस उलट्या जुलाब सुरू झाल्याने त्यांना तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर धरम कानकुबजी व त्यांच्या कुटुंबियांना घरी सोडण्यात आले आहे. सदर प्रकाराबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन यादव यांना विचारले असता त्यांना भगरीतुन विषबाधा झाल्याच्या वृत्तला दुजोरा दिला आहे.
याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन यादव यांनी अधिक माहिती देत नागरिकांना आवाहन केले आहे.
भगरीतुन विषबाधा होत असल्याच्या घटनेमुळे नागरिकांना मध्ये भीतीची वातावरण पसरले असून ऐन नवरात्रीत नागरिकांनी भगरकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सं.पा. शिंदे यांच्याशी याबाबत फोनवरून चर्चा केली असता त्यांनी नगरहून अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी रा.ना. बडे यांना सदर घटनेच्या तपासासाठी पाठविले असल्याची माहिती दिली.
अधिक माहिती देताना सहाय्यक आयुक्त श्री शिंदे म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत अनेक ठिकाणी साठे जप्त करण्यात आले असून कारवाई करण्यात आली आहे तसेच नागरिकांना नवरात्र उपवास काळात पदार्थ तयार करताना घ्यावयाच्या काळजीबाबत आवाहन करण्यात आल्याचे पत्रके प्रसिद्ध केले असल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या घटनेने शहरात खळबळ उडून उडाली असून महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे
Post Views:
778