अवास्तव घरपट्टीच्या साखळी उपोषणाला विविध संस्था, व संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा
Spontaneous support of various institutions and organizations to the chain hunger strike of unrealized housing
दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच;The fast continued on the second day as well;
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed .28 Sep, 20.30 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही अवास्तव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठीच्या साखळी उपोषणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर दर्शवला.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) यांचे आज दुसऱ्या दिवशी बुधवारीही हे उपोषण सुरूच होते.
वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणीचा निर्णय होईपर्यंत हे उपोषण चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या उपोषणास भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ज्योती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रविकाका बोरावके, पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष कैलासशेठ ठोळे, व्यापारी महासंघाचे राजेंद्र बंब, सुधीर डागा व इतर पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेचे प्रसाद नाईक व इतर पदाधिकारी, भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष निसार शेख व इतर पदाधिकारी, लब्बैक सोशल फाउंडेशनचे अकबर शेख व इतर पदाधिकारी, हनुमाननगर येथील हनुमान मित्रमंडळाचे विनोद दुकळे व इतर पदाधिकारी, लाड सुवर्णकार संस्थेचे प्रकाश विश्वनाथ भडकवाडे व इतर पदाधिकारी, महात्मा फुले मंडळाचे प्रदीप नवले, विशाल राऊत व इतर पदाधिकारी, कर्ण ग्रुप, हनुमाननगर, कोपरगावचे सनी धिवर व इतर पदाधिकारी, दत्तनगर- गोरोबानगर येथील राजमुद्रा फाउंडेशनचे अविनाश पाठक व इतर पदाधिकारी, श्री संत सावता माळी युवक संघाचे मुकुंद मामा काळे व इतर पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतीश काकडे व इतर पदाधिकारी, मोहनीराजनगर, बेट येथील हिंदूसम्राट संघटनेचे बापू काकडे व इतर पदाधिकारी, हिंदू एकता तरुण मंडळाचे (फडे चौक) विजय चव्हाणके व इतर पदाधिकारी, कोपरगाव मुद्रण असोसिएशनचे संजय कोपटे व इतर पदाधिकारी, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव आढाव व इतर पदाधिकारी आदी अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच साई देवा प्रतिष्ठानचे दीपक वाजे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.