वाढीव कर कमी होतील आ. आशुतोष काळेंमुळे मोठा दिलासा – सुधीर डागा

वाढीव कर कमी होतील आ. आशुतोष काळेंमुळे मोठा दिलासा – सुधीर डागा

Increased taxes will come down. Big relief due to Ashutosh Kale – Sudhir Daga

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed .28 Sep, 21.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नगरपरिषदेने चुकीच्या सर्वेच्या आधारावर शहरातील नागरिकांना व व्यावसायिकांना बजावलेल्या वाढीव कराच्या पावत्यांचे वितरण होत असतानाच चुका झाल्याचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी मान्य केले. कोपरगाव शहरवासियांवर आलेले हे आर्थिक संकट आ.आशुतोष काळे यांच्यामुळे टळले असून नागरिक व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे कोपरगाव व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी सांगितले आहे.


आ. आशुतोष काळेंनी करवाढ संदर्भात घेतलेली भूमिका योग्य– डॉ. अजय गर्जे

चुकीच्या सर्वेच्या आधारे कोपरगाव नगरपरिषदेने केलेली करवाढ देखील चुकीची आहे. हे आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या बैठकीत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कबूल केले आहे. त्यामुळे करवाढ संदर्भात आ. आशुतोष काळेंनी घेतलेली भूमिका योग्यच आहे.

संजीवनीचे पाकीट घेणाऱ्यांच्या भाषणाने करवाढीचा प्रश्न सुटणार नाही – भरत मोरे

आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे मात्र या आंदोलनात संजीवनीवर रोज चकरा मारणारे आणि संजीवनीचे पाकीट घेणारे भाषण करीत आहे. त्यांच्या भाषणाने करवाढीचा प्रश्न सुटणार नाही असा भाजपाच्या देखावा आंदोलनाला महाविकास आघाडी शिवसेनेचे भरत मोरे यांनी चिमटा काढला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page