कोपरगाव शिंगणापूरात दगडाने ठेचून अनोळखी  महिलेची हत्या 

कोपरगाव शिंगणापूरात दगडाने ठेचून अनोळखी  महिलेची हत्या 

An unknown woman was killed by crushing her with a stone in Kopargaon Shingnapur

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat.1 Aut , 15.20 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव अज्ञात कारणावरून  कोपरगाव रेल्वे स्टेशन परिसराच्या लगत  संजीवनी कारखाना ते शिंगणापूर रस्त्यावरील श्रीमान काशिनाथदादा लोणारी व्यापारी संकुलाच्या आरुष अँड आईस्क्रीम पार्लर या दुकानाच्या  जवळ दगडाने ठेचून मध्यमवयीन अनोळखी  महिलेची  हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि३०) सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते शनिवारी (दि १) ऑक्टोबर सकाळी ८.१५ वाजेच्या दरम्यान कोपरगाव  रेल्वे स्टेशन लगत शिंगणापूर  शिवारात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एका अनोळखी महिलेचा (वय -४०-४५, नाव गाव माहित नाही)  डोक्यावर तोंडावर ओठाजवळ या दगडाने  मारहाण करून तिला जीवे ठार मारले . 
  शनिवारी (दि १) ऑक्टोबर रोजी  सकाळी  आठ वाजता पोलिसांना शिंगणापूर पोलीस पाटील सौ सविता प्रशांत आढाव यांनी माहिती कळविली त्यानुसार  शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळाला भेट देऊन सदर शव ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवले या प्रकरणी शिंगणापूर पोलीस पाटील सौ सविता प्रशांत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी कोपरगाव शहर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अनोळखी महिलेच्या हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी संजय सातव यांनी सकाळी दहा वाजता भेट दिली त्यांच्या  निर्देशानुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली या हत्या प्रकरणाचा पुढील तपास पोसई भरत दाते हे करीत आहेत. 

Leave a Reply

You cannot copy content of this page