पालिकेने केवळ १० टक्केच करवाढ करावी; हीच आपली खरी लढाई -बिपीन कोल्हे
The municipality should raise taxes only by 10 percent; This is our real battle – Bipin Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat.1 Aut , 17.20 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पालिका प्रशासनाची करवाढ ही अनिवार्य प्रक्रिया आहे. त्यामुळे शहरातील जनतेला करवाढीच्या आर्थिक बोजापासून न्याय मिळवून देण्यासाठी आता पालिकेने भाडेतत्त्वावर केवळ दहा टक्के करवाढ करावी असे माझे मत आहे आणि हीच खऱ्या अर्थाने भाजप शिवसेना रिपाई (आठवले गट) यांची लढाई असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी एका कार्यक्रमात केले
कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने एकाधिकारशाहीने मनमानी पद्धतीने चुकीच्या फेर सर्वेक्षणावरून भांडवली मूल्यावर आधारित ४०% टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या जुलमी करवाढीला बिपिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार स्नेहलता कोल्हे व कोल्हे कारखाना अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप, शिवसेना, रिपाई (आठवले गट ), आपण लढा देऊन जोरदार विरोध केल्यामुळे या
जुलमी करवाढीस जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली तूर्तास कोपरगावकरांवरील आर्थिक बोजा टळला यानिमित्त आभार व्यक्त करण्यासाठी भाजप शिवसेना रिपाई (आठवले गट) कार्यकर्ते, नागरिक, पदाधिकारी यांनी शनिवारी (दि१) रोजी संजीवनी कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे व भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार केला
बिपीन कोल्हे म्हणाले की, पालिकेच्या नियमाप्रमाणे करवाढ ही करावीच लागेल परंतु ती करताना आपल्याला जनतेचे हित लक्षात घ्यायला पाहिजे त्या दृष्टीने विचार करता तात्कालीन नगरसेवकांनी केवळ ० .२५ टक्के कर वाढीस मंजुरी दिली होती. आता कोरोना आणि सद्य स्थितीत कोपरगाव बाजारपेठेचे विचार करता भाडेतत्त्वावर आधारित केवळ दहा टक्केच करवाढ पालिका प्रशासनाने करावी यासाठी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे यासाठी आपल्याला सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करून प्रामुख्याने जनहिताचा विचार करावा लागणार आहे आणि त्याच दृष्टीने आपली खरी लढाई यापुढे सुरू होणार आहे.
बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, शहरातील मालमत्तेचा विचार करता ७५ टक्के लोक स्लम एरियात अर्थात सरकारी जागेवर राहतात तर ५० टक्के लोक हे फ्लड एरिया अर्थात पूर रेषेच्या अंतर्गत राहतात दर दोन पाच वर्षांनी या ठिकाणी पूर येऊन मालमतेचे मोठे नुकसान होते आणि सरकारला त्याची नुकसान भरपाई अदा करावी लागते. हे सर्व प्रांताधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व राज्य सरकारच्या निदर्शनास आपल्याला आणून द्यावे लागणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडून जनरेटा देऊन तसा प्रस्ताव तयार करून घ्यावा लागणार आहे. ज्या दिवशी भाडेतत्त्वावर दहा टक्के कर आकारणी होईल व तशा नोटिसा लोकांना येतील अर्थात त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला लढा यशस्वी झाला असे म्हणता येईल. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे राजकारण होता कामा नये ही काय कोणाची राजकीय किंवा श्रेयाची लढाई नाही तर ज्या जनतेचा आपण प्रतिनिधित्व करतो त्या जनतेच्या हिताची व विश्वासाची एक लढाई आहे. ही लढाई सर्वांसाठीच खुली आहे असाही टोला त्यांनी शेवटी लगावला.
यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे पराग संधान, केशव भवर, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, विजय आढाव, संजय सातभाई, कैलास जाधव,दिपक साळुंके, जितेंद्र रणशुर, योगेश बागुल, स्वप्नील निखाडे,जनार्दन कदम, विनोद राक्षे, अतुल काले, अविनाश पाठक, प्रशांत कडू, , संदीप देवकर, अशोक लकारे, बबलू वाणी, सागर जाधव, प्रसाद आढाव, बाळासाहेब आढाव अरिफ कुरेशी पप्पू पडियार, रंजन जाधव बापू पवार संजय जगदाळे विवेक सोनवणे खलील कुरेशी सद्दाम सय्यद आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
Post Views:
637