जिनिंग प्रेसिंग सोसायटीची वाटचाल समाधानकारक – आ.आशुतोष काळे
Progress of Ginning Pressing Society is satisfactory – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat.1 Aut , 18.30 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :- कर्मवीर शंकरराव काळे यांनी सहकारी संस्था स्थापन करून सहकाराची जोपासना केली. प्रतिकूल परिस्थितीत जिनिंग प्रेसिंग सोसायटीची वाटचाल समाधानकारक असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी ६१ वी वार्षिक सर्वसाधारणसभेत केले अध्यक्षस्थानी चेअरमन गोरक्षनाथ जामदार हे होते .
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, शंकरराव चव्हाण, विष्णू शिंदे, माजी संचालक सचिन रोहमारे, संस्थेचे माजी चेअरमन निवृत्ती शिंदे, व्हा.चेअरमन गणेश गायकवाड, संचालक सचिन आव्हाड, सुदाम लोंढे, किसनराव आहेर, कचेश्वर डुबे, भाऊसाहेब देवकर, बशीर शेख, शिवाजी वाबळे, दिलीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, जिनिंग प्रेसिंग संस्था स्थापन करण्यामागे शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला योग्य दर मिळावा हा उद्देश होता. मात्र दिवसेंदिवस कापूस पिकाचे कमी झालेले प्रमाण व मोठ्या प्रमाणात कापसाची होत असलेली खाजगी खरेदी त्यामुळे जिनिंग प्रेसिंगला कापूस मिळण्यात मागील काही वर्षापासून अडचणी येत आहे. मात्र संस्थेने प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता पूरक व्यवसाय सुरु करून संस्था प्रगतीपथावर ठेवली हि समाधानाची बाब आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने कापूस उद्योगात राज्यातील अद्यावत जिनिंग प्रेसिंग युनिटची पाहणी करून अभ्यास करावा. भविष्यात असे अद्यावत युनिट सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे व संस्थेचे भाग भांडवल वाढविण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे असे आवाहन केले.
प्रास्ताविक करतांना संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांचे मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात संस्थेला ७९.२९ लाख नफा झाला असून संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचे सांगितले.
अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर काशिद एस.एन.यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.बी.शेख यांनी केले तर आभार संचालक सचिन आव्हाड यांनी मानले.