पोहेगावात भर रस्त्यावर दिवसा वृद्धाला लुटले; तिसरा घटना
An old man was robbed in broad daylight in Pohegaon; Third event
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat.1 Aut , 17.30 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पोहेगाव बाजार तळाजवळ दुचाकी स्वरांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका वृद्धाला लुटले. आजूबाजूला असणाऱयांना समजणारही नाही अशा पद्धतीने आरोपींनी वृद्धाची सोन्याची, अंगठी असा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला,
शनिवारी (दि१) रोजी दिवसा बारा वाजेच्या दरम्यान नवनाथ भिकाजी नवले हे आपल्या स्कुटी वरून सोनेवाडी पोहेगाव रस्त्याने आपल्या घरी जात असताना पोहेगाव बाजार तळाजवळ सोनेवाडी मार्गे येणाऱ्या दुचाकी स्वरांनी त्यांना थांबवले. पत्ता विचारण्याचा बहाणा करत युनिकॉन व स्कूटीवरून आलेल्या चोरट्याने नवले यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट व अंगठी त्यांना भुरळ पडत रूमालात गुंडाळून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू चोरट्यांनी चोरून पोबारा केला.
यापूर्वी अशीच घटना मागच्या महिन्यात पोहेगांव पेट्रोल पंपाजवळ भाऊसाहेब औताडे यांच्या बाबतीतही घडली होती. त्यांच्या हातातील दोन्ही बोटातील अंगठ्या चोरट्याने काढून घेतल्या होत्या तर डॉ. झवर यांच्या दवाखान्यातूनही चोरट्यांनी सोन्याचे ब्रेसलेट चोरले होते.
पोहेगावांतली ही लागोपाठची तिसरी घटना असून वृद्ध व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत पोहेगाव दूरक्षेत्र नुसतेच नावाला असून ते सदा बंद असते. त्यामुळे या धूम स्टाईल चोरांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळता शिर्डी पोलीस स्टेशनने घटनास्थळी धाव घेत बाजूलाच कृषी सेवा दुकानात असलेले सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले. पुढील तपास पोलीस करत आहेत
Post Views:
234