स्वतःचा व्यवसाय सक्षम करून आर्थिक स्रोत वाढवावा – आ.माणिकराव कोकाटे

स्वतःचा व्यवसाय सक्षम करून आर्थिक स्रोत वाढवावा – आ.माणिकराव कोकाटे

Empower your own business and increase financial resources – A. Manikrao Kokate

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun.2 Aut , 19.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  सरकारच्या भरवंशावर बसण्यापेक्षा आपला व्यवसाय सक्षम करून आर्थिक स्रोत वाढवला पाहिजे असे प्रतिपादन सिन्नरचे आ माणिकराव कोकाटे यांनी पाथरे येथे जय मल्हार पतसंस्थेच्या कार्यक्रमात दूध व्यवसायिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सरला बेट चे मंहंत रामगिरी महाराज व महंत रमेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते या  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी दूध उत्पादकांचे  हित डोळ्यासमोर ठेवून जय मल्हार पतसंस्थेने काम करावे असे आवाहन  केले.
यावेळी नितीन औताडे यांनी  गेल्या वीस वर्षापासून दूध धंद्यात सातत्य राखत अमोल औताडे यांनी पोहेगांव पाथरे परिसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाई म्हशी खरेदीसाठी आर्थिक सहाय्य केले त्यामुळे परिसरात दूध व्यवसाय वाढला. ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा पतसंस्थेच्या माध्यमातून वाढला आहे. असल्याचे गौरव उद्गार व्यक्त केले 
कार्यक्रमास  नितीन औताडे, महंत पांडुरंग गिरी महाराज, अरुणराव येवले,  उषाताई औताडे, संजय औताडे,  राजेंद्र घुमरे, अमोल औताडे,  रवींद्र बारहाते, बापुसाहेब औताडे,   मंदाकिनी दवंगे,  प्रदीप पाटील,  सुजाताई नरोडे,  विष्णू बेंडकुळे,  कुसुमताई राहाठळ, श्री  गुंजाळ ,  लताबाई बारहाते, दौलत चिने, बाळासाहेब खळतकर,मुकेश निमसे, भिवाजी निमसे, बाजीराव निमसे, भास्करराव निमसे ,राहुल निमसे, सरपंच कैलास रहाणे ,आप्पासाहेब औताडे ,बाबासाहेब औताडे, सचिन शिंदे,  अमोल औताडे,  विजय होन, विनायक मुजगुले, श्रीकांत रांधव,  आदिनाथ झुराळे, अशोक औताडे,  बाळासाहेब राहणे,  विवेक सिंग, श्रीकांत थोरे, विलास तनपुरे ,सचिन मुंडे, जनार्धन भागवत, रवींद्र बारहाते, संतोष चिने विलास पाटील, सचिन उगले, जय मल्हार पतसंस्थेचे संचालक कर्मचारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अमोल औताडे यांनी केले. अरुणराव येवले मंहंत पांडुरंग गिरी महाराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जावळे यांनी केले तर आभार राजेंद्र घुमरे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page