ग्रामपंचायतींची चौदाव्या वित्त आयोग; १० टक्के कपातीची रक्कम परत मिळावी
Fourteenth Finance Commission of Gram Panchayats; 10 percent deduction should be recovered
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon.3 Aut , 19.30 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : तालुक्यातील बहुतांष ग्रामपंचायतींच्या चौदाव्या वित्त आयोगातील विकास कामांची राज्यातील मागील महाविकास आघाडी शासनाने दहा-दहा टक्के रक्कम कपात करून घेतलेली आहे त्यामुळे विकास कामे करण्यांत अडचणी तयार होत आहेत तरी ही रक्कम तात्काळ संबंधीत ग्रामपंचायतींना देण्यांत यावी अशी मागणी कोपरगांव तालुक्यातील विविध गांवच्या सरपंच-उपसरपंच यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी बोलाविलेल्या जनता दरबारात केली.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी येथील तहसिल कार्यालयात तालुक्यातील तसेच व्यक्तीगत प्रलंबित विकास कामांच्या अडी अडचणींची सोडवणुक व्हावी यासाठी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे जनता दरबार घेत असतात. त्यात ही मागणी करण्यांत आली.
प्रारंभी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान व त्यांच्या सहका-यांनी उक्कडगांव व कारवाडी गांवच्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांची कामे तातडीने मार्गी लावली तसेच कोपरगांव शहरवासियांची जास्तीच्या घरपटटीला स्थगिती दिली त्याबददल तहसिलदार व गटविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यांत आला तो नायब तहसिलदार पी डी. पवार व विस्तार अधिकारी साबळे यांनी स्विकारला.
याप्रसंगी गोधेगांव येथे दलित बांधवांना अंत्यविधीसाठी स्मशानभुमीसाठी जागा मिळावी याबाबत संबंधीत प्रशासकीय यंत्रणेस अनेकवेळा निवेदने दिलेली आहेत, ११ ऑक्टोंबर रोजी उपोषणाचाही इशारा दिला आहे. आपेगांव रहिवासीयांना पिण्यांच्या पाण्यांसाठी योजना मंजुर आहे मात्र त्यासाठी घोयेगांव शिवारात शासनांची सिलींगची जमिन मिळावी म्हणून प्रस्ताव दिलेला आहे तो तात्काळ मार्गी लागावा, घरकुलाच्या ड वर्ग यादीत सिस्टीम रिजेक्टेड झालेल्या लाभाथ्र्यांचा अपिल अर्ज केलेले आहेत त्याचा निर्णय व्हावा, धोंडेवाडी महिला बचतगटास स्वस्त धान्य दुकान चालविण्यांस मिळावे, उक्कडगांव पंचक्रोशीत विविध शासकीय लाभाच्या इमारती उभ्या आहेत त्यासाठी बक्षिस पत्रान्वये जमिनी दिल्या त्याची शासन दरबारी नोंद व्हावी हा प्रश्न गेल्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित आहे, माहेगांव देशमुख येथील २०१२ च्या पात्र घरकुलधारकास सदर योजनेचा लाभ मिळावा व शौचालयाचे थकीत अनुदान वारंवार मागणी करूनही मिळत नाही त्यामुळे लाभार्थी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार चकरा मारतात, धोंडेवाडी येथे जिल्हाधिका-यांच्या स्वाक्षरी जमीन देण्यांत आली आहे त्याची नोंद शासनव्हावी, जेउपाटोदा हददीतील रहिवासीयांना तसेच शहरातील कालीदीनगर, बँक कॉलनी, कालीकानगर, आदि ठिकाणी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी समस्येला तोंड देण्यांत आले त्याबाबत मागील जनता दरबारात मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी संबंधीत ठिकाणी जाउन सर्व्हेक्षण करून या समस्येचे निराकरण होईल असे सांगितले मात्र महिना उलटुन गेला तरी हे काम झालेले नाही ते मार्गी लागावे, लक्ष्मीनगर रहिवासीयांना त्यांच्या जागा कायमस्वरूपी सात बारा उता-यावर नोंद होण्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश केलेले आहेत मात्र त्याचे सर्व श्रेय तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांना जाईल म्हणून हे उतारे संबंधीतांना अद्यापही देण्यांत आलेले नाही ते तात्काळ मिळावे, चांदगव्हाण, मुर्शतपुर, जेऊरपाटोदा, खोपडी येथे बसेस चालु होत नाही त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो तेंव्हा या बसेस तात्काळ सुरू कराव्या, जेउरपाटोदा परिसरातील रहिवासीयांना वीज रोहित्र मंजुर आहे मात्र त्याचे काम पाच वर्षापासून प्रलंबित आहे ते पुर्ण करावे, बोलकी येथे २५ कुटूंबे निराधार असुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही तो तात्काळ सुरू करावा, नविन शिधापत्रिका व दुबार शिधापत्रिका मागणी करणा-या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे स्टेशनरी शिल्लक नाही असे प्रशासन नेहमीच सांगते त्यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था करूनही गेल्या दोन महिन्यांपासुन शिधापत्रिका मिळत नाही त्या तात्काळ मिळाव्या, आदि प्रलंबित समस्या यावेळी मांडण्यांत आल्या.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, बबनराव निकम, शहराध्यक्ष दत्ता काले, सर्वश्री. सचिन कोल्हे, रविंद्र पाठक, विजय आढाव, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, कैलास राहणे, अंबादास पाटोळे, संजय तुळस्कर, विवेक सोनवणे, प्रभाकर शिंदे, दिनेश कांबळे, श्री. केकाण यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आदि उपस्थित होते. शेवटी साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.