जनताच आमदार काळेंना धडा शिकवेल”, वाजेंच्या या दाव्यावर गंगुलेंचा पलटवार;
It is the people who will teach Kale MLAs a lesson”, Gangule’s retort to Waje’s claim;
म्हणाले… वाजेंची लायकी आहे का? That said… Are the bells worth it?
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue .4 Oct , 19.30 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कारभार प्रश्न जनताच आमदार काळेंना धडा शिकवेल, असा दावा भारतीय जनता पार्टीचे बाजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी लोकप्रतिनिधींवर टीका करायची वाजेंची लायकी आहे का? -असा पलटवार केला आहे. प्रसिद्धी माध्यमाद्वारे त्यांनी भाजपावर सडकून टीकाही केली.
विजय वाजे यांच्या घरात मागील वीस वर्षापासून कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता आहे. त्यांना आपल्या प्रभागातील गटारी करता आल्या नाही. ते विकासाची भाषा शिकवतात.मात्र ज्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत ते नागरिकांची दिशाभूल करीत आहे अशी टीकाही गंगुले यांनी केली.
कायद्यात तरतूद असल्याप्रमाणे ४०% करवाढ करण्याबाबत कुणीही सहमती दिली नाही देणार पण नाही. त्यामुळे कमीत कमी किती कर आकारला जावू शकतो याबाबत प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्याकडे आ. आशुतोष काळे यांचे बारीक लक्ष आहे. शहराची तहान भागविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारे आ. आशुतोष काळे कोपरगावकरांवर कधीहि अन्याय होवू देणार नाही याचा शहरवासीयांना विश्वास आहे. ज्यांनी पाच वर्ष सत्ता भोगली, सत्तेत राहून मलिदा खाल्ला. त्यांना कोपरगावकरांप्रती खोटा कळवळा असल्याचा टोमणा गंगुले यांनी प्रसिद्धी पत्रकात लगावला आहे.
मागील पाच वर्ष हे सत्तेवर असतांना त्यावेळी त्यांना वाढीव घरपट्टी बाबत समजले नाही का? त्यावेळी हा विषय चर्चेला का घेतला नाही? का त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले हे देखील त्यांनी स्पष्ट करावे. योग्य भूमिका न घेतल्यामुळे कोपरगावकरांवर अवास्तव करवाढीच संकट आणून ठेवल.
मात्र हे संकट आ. आशुतोष काळे येवू देणार नाहीत. त्यासाठी त्यांनी बैठका घेवून कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला सूचना देवून करवाढ कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे देखील पत्र व्यवहार केला आहे. व प्रशासनाने सर्वे चुकीचा झाल्याचे मान्य केले आहे चुकीची करवाढ कमी होणार आहे मात्र वावड्या सोडून नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचे गंगुले यांनी म्हटले आहे.
आ. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात ११०० कोटीच्या निधीतून झालेला विकास मतदार संघातील जनतेला दिसत आहे. मात्र ज्यांच्या डोळयावर राजकारणाची पट्टी आहे त्यांना हा विकास कधीच दिसणार नाही. असा दावा गंगुले यांनी पत्रकातून केला आहे
चौकट :-एकीकडे करवाढीला स्थगिती मिळाल्याचे पेढे वाटता. फ्लेक्स बोर्ड लावून दिंडोरा पिटायचा. व दुसरीकडे १० % करवाढीची मागणी करता हि जनतेची दिशाभूल नाही का?- सुनील गंगुले.