मुलींना कायद्याचे ज्ञान असणे ही काळाची गरज -ॲड. राजश्री शिंदे
It is the need of the hour for girls to have knowledge of law – Adv. Rajshree Shinde
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 19.20 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : बहिणाबाई चौधरी, सुधा मूर्ती ह्या स्त्री-पुरुष समानतेच्या जीवंत उदाहरण आहेत व त्यांचा आदर्श युवा पिढीने घेतला पाहिजे.वर्तमान तांत्रिक युगात विशेषता मुलींनी सतर्क रहाणे तसेच कायद्यासंदर्भात त्यांना ज्ञान असणे ही काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन ॲड. राजश्री शिंदे यांनी सोमय्या महाविद्यालयात ‘स्त्री-पुरुष समानता: कायद्यातील तरतुदी’ याविषयावरील कार्यशाळेत केले.
ॲड. राजश्री शिंदे पुढे म्हणाल्या की, “कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा, संपत्तीत मुलींचा हक्क कायदा, माहिती व तंत्रज्ञान कायदा इत्यादी कायद्यांची माहिती विद्यार्थींनीना असणे गरजेचे आहे.”
प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतांनाच महाविद्यालयात विद्यार्थींनीसाठी राबवले जाणाऱ्या विविध उपक्रमाच्याही माहिती दिली.
महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. तर सदस्य प्रा. नीता शिंदे यांनी आभार व्यक्त केली.
प्रा. प्रज्ञा कडू यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. वर्षा आहेर, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा. एस.जी. कोंडा, प्रा. आर.ए. जाधव, प्रा. वृषाली पेटकर, प्रा. पूजा गख्खड, यांनी विशेष परीश्रम घेतले.