प.पू .विजय काका पोफळी महाराजांचे कोपरगावात तीन दिवसीय प्रवचन

प.पू .विजय काका पोफळी महाराजांचे कोपरगावात तीन दिवसीय प्रवचन

 Vijay Kaka Pofli Maharaj’s three-day sermon in Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 19.40 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील त्रिपदी परिवाराच्या वतीने  वासुदेवानंद आश्रम (अभ्यासिका) वाशिमचे धर्मभूषण श्रीदत्तसंप्रदायवर्धक समर्थ सद्गरु प.पू .विजय काका पोफळी महाराज यांचे १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसीय प्रवचन सोहळा कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे रोज सायंकाळी साडे सहा ते आठ या वेळेत हे प्रवचन होणार आहे, त्यात दत्त संप्रदायाचे प्रवर्तक प.पु.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी (थोरले महाराज)यांचे जीवन चरित्र या विषयावर भाविकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्रिपदी परिवार कोपरगावच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page