कोपरगाव बाजार समितीबाहेर परस्पर मालाची विक्री; शेतकऱ्यांची फसवणूक, कारवाई सुरू  

कोपरगाव बाजार समितीबाहेर परस्पर मालाची विक्री; शेतकऱ्यांची फसवणूक, कारवाई सुरू 

Mutual sale of goods outside the Kopargaon Bazaar Committee; Fraud of farmers, action started

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 19.50 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : बाजार समितीचा परवाना न घेता अवैधपणे काही खाजगी खेडा व्यापारी काटे उभारून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन घरी जाऊन त्यांना ज्यादा भावाचे  आमिष दाखवून आद्रता मशीन मध्ये हा चलाखी करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत अशा व्यापाऱ्यावर बाजार समितीने कारवाई सुरू केले असल्याचा इशारा बाजार समितीचे प्रशासक नामदेवराव ठोंबळ यांनी दिले आहे

सोयाबीन, मका या पिकाची काढणी सुरु असल्याने मजुरांना देण्यासाठी व रब्बी पिके उभे करण्यासाठी शेतक-यांना पैशाची गरज आहे. शेतक-यांच्या या अडचणींचा फायदा घेवुन खाजगी व्यापारी आर्द्रता मोजण्याच्या मॉईश्चर मीटर मध्ये तांत्रिक बिघाड करुन वाळलेली सोयाबीन आर्द्रता जास्त़ दाखवुन प्रतवारी कमी असल्याचे भासवुन वजनमापात २ ते ५ किलो पर्यंत काटा मारतात तसेच वजनमाप करतांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटयात ॲडजेस्ट़मेंट करुन काटा करतात व शेतकरी वर्गास फसवत आहे.
 बाजार समितीमध्ये उघड लिलावाचे बोलीने सर्व धान्याचे लिलाव होत असल्यामुळे शेतक-यांचे शेतमालाला उंच भाव मिळतात, बाजार समितीमध्ये हमाली व तोलाई वगळता शेतक-यांच्या काटा पट्टीत कुठलिही कपात केली जात नाही या व्यतीरीक्त़ त्यांना पैशाची हमी आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळण्याकरीता कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य़ आवारात विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक ठोंबळ यांनी केले आहे. 
       अशा व्यापा-यांवर कारवाई करणेकरीता बाजार समितीने पथक नियुक्त़ केले आहे. तसेच शेतकरी बांधवांनी शेतमाल विकत असतांना व्यापा-यांकडुन हिशोब पट्टीची प्रत घ्यावी त्यामुळे शेतक-यांना भविष्यात शासनाकडून अनुदान योजनेचा फायदा घेता येईल या दृष्टीने कोपरगाव बाजार समितीच्या आवारात भुसार, सोयाबीन विक्रीस आणवा असे आवाहन सचिव  एन. एस. रणशुर यांनी  शेतक-यांना केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page