कोल्हे साखर कारखाना आधुनिकीकरणातून नंबर वन करू- बिपीनदादा कोल्हे
Kolhe sugar factory will become number one through modernization – Bipindada Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 20.30 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : साखर कारखानदारीचे अर्ध्यवु माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सतत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करत ग्रामिण भागातील सभासद शेतक-यांचे शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून नाविन्यपुर्ण प्रयोगांना साथ देत ते यशस्वी करून दाखविले तोच वसा कायम ठेवुन चालु वर्षी विक्रमी उसाचे उत्पादन लक्षात घेता सभासद शेतक-यांनी स्वतःचे उसतोडणी संयंत्र, किटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोन, उस वाहतुकीसाठी ट्रक-ट्रॅक्टर घेवुन अद्यावत यंत्रणा उभी करावी त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना स्वतः काही काळ ऊस तोडणी सयंत्र, ड्रोन, ट्रॅक्टर आदी वरील व्याजाचा भुर्दंड सहन करेल अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी देत कारखाना यावर्षी विक्रमी दहा लाख टन उसाचे गाळप, उसाचा रसापासुन इथेनॉल उत्पादन करून येणारा काळ आधुनिकीकरणासह स्पर्धेचा असल्यांने कारखाना देशात नंबरवन करू असेही ते म्हणाले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विजयादशमीच्या मुहुर्तावर बुधवारी कारखान्यांचे प्रमुख मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, युवानेते अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक विलासराव माळी, सौ. रंजनाताई माळी यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक सर्वश्री. ज्ञानेश्वर परजणे, विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, मनेष गाडे, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, सौ. उषा संजयराव औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, अरूणराव येवले, साहेबराव कदम, संजय होन, दत्तात्रय पानगव्हाणे, शिवाजीराव वक्ते, मधुकरराव वक्ते, कामगार नेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मुख्य रसायन तज्ञ विवेककुमार शुक्ला, मुख्य अभियंता के. के. शाक्य, ए. के. टेंबरे, प्रदिप गुरव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते, आजी माजी संचालक, सभासद कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आंतरराष्ट्रीय साखर कारखानदारीतील प्रसंगांना उजाळा देवुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून युवानेते अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कामगारांच्या सुरक्षिततेला विशेष महत्व देवुन दुचाकीस्वारांसाठी मोफत हेल्मेट देवुन त्यांची मोफत आरोग्य तपासणी करणे यासह नाविन्यपुर्ण उपक्रम राबवित असल्याचे नमुद केले.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची संघर्षातुन उत्कर्ष आणि आधुनिकतेची विचारधारा ही आमच्यासह सर्वांच्या जीवनाची अतुल्य शिदोरी असुन त्यातुन आपल्या कारखान्याबरोबरच परिसराचा तालुक्याचा, जिल्हयाचा, राज्याचा आणि देशाच्या विकासात भर घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू.
मागील हंगामात जादा उसाचे उत्पादन झाल्याने उसतोडणीत मोठया प्रमाणात अडचणी तयार झाल्या आता मात्र त्याचे नियोजन आतापासूनच करून एप्रिल २०२३ अखेरीस सर्व उसाचे यशस्वी गाळप करून साखरेसह इथेनॉल उत्पादनावर भर देवु. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांनी मागील हंगामात साखर उद्योगासाठी जे धाडसी निर्णय घेतले त्याबददल त्यांचे आभार मानून चालूवर्षी देशात विकमी साखर उत्पादनासाठीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच धोरण अवलंबवावे अशी मागणी केली.
सहकारमहर्षी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर कारखानदारीचा अभ्यास करून संजीवनी देशात नंबरवन कशी होईल यासाठी ध्यास घेतला त्यांच्याच पावलावर पाउल देवुन युवानेते विवेकभैय्या कोल्हे हे आधुनिकतेला महत्व देत आहेत. आपला कारखाना यावर्षी बायोगॅसपासून सीएनजी गॅस उत्पादन करून कॉम्प्रेसर सीएनजीवर उस वाहतुक करणारे ट्रॅक्टर चालविण्याचा धाडसी पायलट प्रकल्प राबविणार आहे. उस संशोधन केंद्रातील कोईमतूरच्या २३ आणि वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट पुणे यांच्या ६ हजार अशा ६ हजार २३ विकसीत उस जातीची लागवड देशांत एकमेव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यातच केल्या जातात हे वैशिष्टय आहे. प्रायोगिक तत्वावर तीन हजार सभासदांना किमान दहा गुठे उस बेणे कारखाना मोफत पुरविणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.