उर्ध्व गोदावरी खो-यातील पाटपाण्याच्या प्रश्नासाठी खासदाराच्या  खांद्याला खांदा देवुन संघर्ष करू – बिपीनदादा कोल्हे. 

उर्ध्व गोदावरी खो-यातील पाटपाण्याच्या प्रश्नासाठी खासदाराच्या  खांद्याला खांदा देवुन संघर्ष करू – बिपीनदादा कोल्हे. 

Let’s fight shoulder to shoulder with MP for irrigation issue in Upper Godavari basin – Bipindada Kolhe.

केंद्र शासनाने साखर विक्रीचा हमीभाव ३६०० रुपये करावा_ युवानेते विवेक कोल्हे यांची मागणी.The central government should guarantee the sale price of sugar at Rs 3600 – youth leader Vivek Kolhe’s demand.

केन हार्वेस्टिंगचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण साखर आयुक्तiकडून शाबासकी- युवा नेते विवेक कोल्हेSatellite Survey of Cane Harvesting Kudos from Sugar Commissioner- Youth Leader Vivek Kolhe

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे  कारखान्याचा ६० वा गळीत हंगामThe 60th season of Sahakar Maharshi Shankarao Kolhe Factory

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 3 Nov , 11.00 Am
By राजेंद्र सालकर 

कोपरगांव : शेतक-याचे जीवन पाणीप्रश्नी अवलंबुन असुन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयूष्यभर त्यासाठी लढे देत पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा ही मागणी लावून धरत त्याला सन २००० मध्ये विधीमंडळात मान्यता घेतली आहे तेंव्हा तुटीच्या गोदावरी खो-यात पाण्याची समृध्दी निर्माण होण्यांसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खांद्याला खांदा देवुन पाण्यासाठी संघर्ष करू अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.

येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ बिपीनदादा कोल्हे, खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, कारखान्यांचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक रमेशराव आभाळे सौ. निलमताई रमेशराव आभाळे या उभयतांच्या शुभहस्ते झाला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
            प्रारंभी उपाध्यक्ष रमेश घोडेराव व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले. 
           कारखान्यांचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबददल सभासद शेतक-यांच्यावर्तने त्यांचा खासदार सदाशिव लोखंडे यांनी सत्कार केला. 
            कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, चालु वर्षी दहा लाख टन विक्रमी उसाचे गाळप करून १ कोटी ४० लाख लिटर्स ज्युस पासुन इथेनॉल सह अडीच कोटी युनीट सहवीज निर्मीती करण्याचे उददीष्ट ठेवले असून कारखान्यांचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कमी वेळेत कारखान्यांची गाळप क्षमता विस्तारवाढ करून आधुनिकीकरणाला विशेष प्राधान्य दिले आहे. 
           श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याविना हा पहिलाच गळीत हंगाम आहे. त्यांनी सतत आधुनिकीकरणाला प्राधान्य देत साखर कारखानदारीत जगात होणारी स्थित्यंतरे आत्मसात करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला नेहमीच देशपातळीवर नेत त्यानुरूप ध्येय धोरणे घेत काम केले. साखर व्यवसायातील चढ उतार त्यांनी नेहमीच सांगितले. दुधाला जसा फॅटवर भाव मिळतो तसं भविष्यात साखरेच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. 
           माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाणी प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देवुन त्याच्या सोडवणुकीसाठी आयूष्यभर रस्त्यावर उतरून संघर्ष करत शेतक-यांच्या दारात पाणी नेले. गोदावरी खोरे हे तुटीचे आहे त्याचे कधीही वाटप होते नाही. नगर नाशिकसह मराठवाडयाचा पाणीप्रश्न सोडविण्यांसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी रस्त्यावर उतरावे याप्रश्नी भलेही रोष पत्करण्याची पाळी आली तरी आम्ही त्यांना साथ करू. 
           केंद्र व राज्य शासनाकडे त्यांनी बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांचे हक्काचे पाणी नांदुरमध्यमेश्वर बंधारा मुखाशी मोजुन मिळावे यासाठी आग्रह धरावा. 
            निफाड, येवला, कोपरगांव, राहाता, वैजापुर, सिन्नर ही तालुके पर्जन्यछायेखाली येतात त्यामुळे येथील शेतकरी नेहमीच पाणीप्रश्नी संघर्ष करत आलेला आहे. 
          केंद्र शासन आर्थीक जीडीपीचा दर तिमाही आढावा घेते तद्ववत केंद्र व राज्य शासनांने शेतक-यांच्या शेतीसाठी पाणीप्रश्न कुठपर्यंत सुटला त्यात किती टक्क्यांनी वाढ झाली याचा आढावा घ्यावा. जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही खासदार सदाशिव लोखंडे यांना सोडणार नाही. 
           पिक विमा कंपन्यांनी चालु खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, मका आदि पीक नुकसानीपोटी शंभर टक्के भरपाई शेतक-यांना द्यावी असेही ते म्हणाले. 
            खासदार सदाशिव लोखंडे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे व कोपरगांव मतदार संघाने मला वेळोवेळी साथ दिलेली आहे तेंव्हा त्यांचा सेवक म्हणून येथील सर्व प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी काम करू.
            निळवंडे धरणाचे पाणी टेलपर्यंत कालव्याद्वारे डिसेंबर २०२२ पर्यंत मिळावे यासाठी प्राधान्यांने काम हाती घेतले आहे. पश्चिमेचे घाटमाथ्याचे पाणी गोदावरी खो-यात मिळावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने ३० हजार कोटी रूपयांच्या कामाला सुरूवात करण्याचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेतले आहे. 
           गोदावरी कालवे शंभर वर्षाचे झाल्याने त्याचेही नुतकणीकरणासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जास्तीच्या निधीची मागणी करू. 
           भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनीला आपले कुटूंब मानून सभासद शेतकरी कामगार व त्यावर अवलंबुन असणा-या सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी १९६० सालापासून गेली ६२ वर्षे तळमळीने कार्य केले तोच वसा आम्ही पुढे चालवत आहोत. सभासद कार्यकर्त्यांना अंतर न देता त्यांचे प्रश्न हक्काने सोडवुन या मतदार संघाच्या प्रगतीत कायम साथ देत राहु.
            माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी नेहमीच आधूनिकीकरणाला प्राधान्य देत खुल्या आर्थीक स्पर्धेतील आव्हाने सन १९९४ च्या आधी वीस वर्षे जाणून घेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात इथेनॉल, रासायनिक उपपदार्थ निर्माती, हायट्रोजन, बायोगॅस, सहवीज निर्माती, ज्युस पासून इथेनॉल अशी कितीतरी धाडसी पावले टाकत ते यशस्वी करून दाखविले त्यामुळेच कोल्हे कारखाना बदलत्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत देशात अव्वल आहे. स्व. कोल्हेंच्या आठवणी सांगतांना सौ कोल्हे यांना गहिवरून आले. 
           सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी युवानेते विवेक  कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची सुरू असलेली घोडदौड देशात नांवलौकीक होण्यांसाठी सर्वाचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
           विवेक  कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या सहका-यांनी साखर उद्योगाला आर्थीक स्थैर्यता प्राप्त करण्यांसाठी साखर विक्रीचा हमीभाव ३ हजार १०० रूपयावरून ३ हजार ६०० रुपये करावा व देशात याही वर्षी विक्रमी उसाचे गाळप होणार असल्याने उच्चांकी साखर उत्पादनाला ओजीएल खाली साखर निर्यातीची तात्काळ परवानगी द्यावी जेणेकरून त्याचा सर्वाधिक फायदा शेतक-यांना होईल. 
          आधूनिक विचारधारेतुन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी साखर व त्यावर अवलंबुन असलेल्या उपपदार्थ निर्मीतीतून संजीवनीचा नांवलौकीक देशात वाढविला असून येत्या सात वर्षात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना देशातील अव्वल दहा कारखान्यांच्या यादीत असेल त्यासाठी सभासद शेतक-यासह सर्वच घटकांनी साथ द्यावी. कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढावे यासाठी सभासद शेतकऱ्यांना दहा गुंठे बेणे मोफत देण्याचा धाडसी निर्णय घेतला असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही विवेक भैय्या कोल्हे यांनी केले.
         याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक सर्वश्री ज्ञानेश्वर परजणे, विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, मनेष गाडे, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, सौ. उषा संजयराव औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, अरुणराव येवले, साहेबराव कदम, संजय होन, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव वक्ते, साईनाथ रोहमारे, शिवाजीराव कदम, जयराम गडाख, माजी सभापती मच्छिंद्र टेके, प्रदीप नवले, पराग संधान, कामगार नेते मनोहर शिंदे, कमलाकर कोते, राजेंद्र देवकर, बाळासाहेब पवार, भरत कोकाटे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब पागनव्हाणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मुख्य रसायन तज्ञ विवेककुमार शुक्ला, मुख्य अभियंता के. के. शाक्य, ए. के. टेंबरे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते, आजी माजी संचालक, सभासद, सर्व खातेप्रमुख, उप खाते प्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले. सुत्र संचलन माजी उपाध्यक्ष शिवाजीराव वक्ते यांनी केले. 

चौकट

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आधुनिक विचारसरणीला साथ दिली असून कारखान्याने मागील हंगामात राज्यात सर्वप्रथम तीन हजार एकर क्षेत्रावर उपग्रहाद्वारे केन हार्वेस्टिंग चे नियोजन केले त्याला राज्याचे साखर आयुक्तांनी शाबासकी दिली आहे असे विवेक कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page