संजीवनीमुळे सर्वच नवोदित अभियंत्यांना नोकरीची संधी मिळाली- अमित कोल्हे
All budding engineers got job opportunity due to Sanjeevani – Amit Kolhe
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट; ६० विद्यार्थ्यांची इन्फोसिस मध्ये निवडTraining and Placement; Selection of 60 students in Infosys
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 8 Oct , 18.10 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव: संजीवनी मधिल शिक्षणामुळे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अंतर्गत ; ६० विद्यार्थ्यांची साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीमधील निवडीने ग्रामीण भागातील सर्वच विद्या शाखांमधिल नवोदित अभियंत्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. असल्याचे गौरव उद्गार संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्ट अमित कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले
अमित कोल्हे पुढे म्हटले आहे की, संजीवनीच्या प्रयत्नातुन विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत असलेले विद्यार्थी बहुतांशी ग्रामिण भागातील आहे. मागील दोन अडीच वर्षांच्या करोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील अर्थकारण कोलमडले होते यात ग्रामिण भागाला मोठा फटका बसला आहे. अशा परीस्थितीत संजीवनीने अधिक नेटाने काम करून जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना नोकऱ्या कशा देता येईल यावर लक्ष केंद्रीत केले आणि यातुन मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहे.
इन्फोसिस या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २०२१-२२ च्या अंतिम वर्षातील काॅम्युटर इंजिनिअरींग विभागातील १४, इन्फर्मेशन टेक्नालाॅजी विभागातील ६,मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील १३, इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील ४, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ९ व इंलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील १४ नवादित अभियंत्यांचा समावेश आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख व अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले.