नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीच्या अनुषंगाने अवजड वाहतूक  पंधरा दिवसा करता अन्य मार्गाने वळविणार

नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीच्या अनुषंगाने अवजड वाहतूक  पंधरा दिवसा करता अन्य मार्गाने वळविणार

According to Nagar Manmad highway repair, heavy traffic will be diverted every fifteen days

विळद बायपास चौक ते पुणतांबा फाटा  दरम्यान अवजड वाहतूक मार्गात बदल करण्यात येत आहे Heavy traffic route is being changed between Vilad Bypass Chowk to Puntamba Fata

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 11 Oct , 13.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नगर मनमाड दुरुस्तीच्या अनुषंगाने विळद बायपास चौक ते पुणतांबा फाटा  दरम्यान अवजड वाहतूक मार्गात १५ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर बदल करण्यात येत आहे असे परिपत्रक पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांच्या वाहतूक शाखेकडे जारी करण्यात आले आहे याबाबत कोणाच्या हरकती असल्यास १४ ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयात प्रत्यक्ष भेटून अथवा ईमेल द्वारे दाखल कराव्यात असे आवाहनही या पत्रकातून करण्यात आले आहे

वळविण्यात आलेला  महामार्ग पुढीलप्रमाणे

१)नगर पुणे सोलापूर कडून मनमाड कडे जाणारे सर्व प्रकारचे अवजड वाहतुकीस मिळत बायपास चौक येथून मनमाड कडे जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असून त्यांनी खालील मार्गाचा अवलंब करावा
 अ) कल्याण बायपास चौक अहमदनगर कल्याण मार्गावरून आळेफाटा संगमनेर मार्गे नाशिक कडे किंवा ब)विळद घाट दुध डेअरी चौक शेंडी बायपास अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरून कायगाव गंगापूर वैजापूर येवला तसेच 
२)शनिशिंगणापूर सोनई रोड वरून मनमाड राहुरी कडे येणारे सर्व प्रकारचे अवजड वाहतुकी करता रावडी कडे येण्यास प्रतिबंध करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहतूक नगर औरंगाबाद महामार्गावरून इच्छित स्थळी जातील ३) मनमाड येवला शिर्डी कडून नगर मार्गे पुणे मुंबई कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीस पुणतांबा फाटा येथून नगरकडे येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे ही अवजड वाहतूक पुणतांबा फाटा येथून चांदेकसारे संगमनेर आळेफाटा मार्गे तसेच ४) मनमाड येवला कडून नगर सोलापूर बीड कडे येण्यास सर्व वाहनास पुणतांबा फाटा येथून नगरकडे येण्यास प्रतिबंध केला आहे सदर  अवजड वाहतूक पुणतांबा फाटा येथून वैजापूर गंगापूर कायगाव प्रवरा संगम शेंडी बायपास विळद घाट केडगाव बायपास मार्गे जातील
५) लोणी बाभळेश्वर श्रीरामपूर कडून नगर कडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाबळेश्वर श्रीरामपूर टाकळीभान नेवासा मार्गे नगर कडे जातील.
  प्रस्तुत आदेश बस अत्यावश्यक मालाची वाहतूक करणारी वाहने रस्ता दुरुस्ती करता आवश्यक वाहने व स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणासाठी परवानगी दिलेली वाहनांना लागू राहणार नाही असे म्हटले आहे
 या महामार्गावरून वळविण्यात येत असल्याचे परिपत्रक पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी जारी केले आहे तातडीने नगर मनमाड महामार्गावरील  अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी,  असे आदेश देण्यात आले आहे आहेयाबाबत  हरकती मागविण्यात आल्या आहे त्या सदर हरकती  १४ ऑक्टोबर पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत  पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर या ठिकाणी  प्रत्यक्ष भेटून किंवा ईमेल द्वारे दाखल करावयाच्या आहेत असेही परिपत्रकात म्हटले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page