महिला बचत गटांना दिवाळीत व्यवसायासाठी मोठी संधी – सौ. चैताली काळे
Diwali business opportunities for women self-help groups – Mrs. Chaitali Kale
व्होकल फॉर लोकलVocal for Local
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 11 Oct , 16.00 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :दिवाळीत बाजारपेठेत होणाऱ्या आर्थिक उलाढालीचा महिला बचत गटांना फायदा व्हावा यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाई मंगल कार्यालयात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँक माजी संचालिका सौ. चैताली काळे यांनी दिली .
दिवाळीपूर्वी बाजार पेठेत आकाश कंदील, पणती, रांगोळी, सुगंधी तेल, दिवाळीचा तयार फराळ, सुंगंधी अगरबत्ती, मेणबत्ती, लक्ष्मी पूजन साहित्य आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करीत असतात. या सर्व वस्तू बचत गटाच्या महिला तयार करीत असून त्यांच्या मालाला शाश्वत ग्राहक उपलब्ध होवून बचत गटांचे आर्थिक हित साधण्यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून व्होकल फॉर लोकल हि संकल्पना राबविण्यात येत आहे.
या संकल्पनेतून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले आकाशकंदील, पणती, रांगोळी, सुगंधी तेल, दिवाळीचा तयार फराळ, सुंगंधी अगरबत्ती, मेणबत्ती आदी वस्तू ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होवून खरेदीसाठी होणारी नागरिकांची पायपीट देखील होणार नाही. बचत गटाच्या महिलांनी या संधीचा फायदा घेवून तयार माल विक्रीसाठी आपले स्टॉल्स लवकरात लवकर आरक्षित करावे. शनिवार दि.१५ व रविवार दि.१६ या दोनच दिवस बचत गटांना कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे आपल्या तयार मालाची विक्री करता येणार आहे.
त्यासाठी ८२०८००००६९, ९१४५६१११६८, ९५२७७१६२६९ या मोबाईल नंबरवर बचत गटाच्या महिलांनी संपर्क करावा. नागरिकांनी देखील दिवाळीची खरेदी या ठिकाणी करून चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात खरेदी कराव्यात असे आवाहन सौ. चैताली काळे यांनी केले आहे