नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीकामी पोहेगाव तळेगाव मार्गे अवजड वाहतुक वळविणेस हरकत.
Nagar Manmad highway repair workers object to diversion of heavy vehicles through Pohegaon Talegaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 12 Oct , 18.50 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती कामी पुणतांबा फाटा ते विळद घाट या महामार्गावरील अवजड वाहतूक मनमाडहुन नगर पुणेकडे जाण्यासाठी पुणतांबा फाटा पोहेगाव – तळेगाव – वडगावपान या मार्गावरून वळविणेस शिवसेनेचे नितीन औताडे यांनी हरकत घेतली असून तसा अर्ज जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे पाठविला आहे .

नगर मनमाड या महामार्गाचे दुरुस्ती कामी या महामार्गावरील अवजड वाहतुक १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या १५ दिवसांकरिता पर्यायी मार्गावरून वळविण्याबाबत पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी जाहीर प्रकटन काढलेले आहे. या मध्ये मनमाडहुन पुणेकडे येणारी व जाणारी वाहतुक ही पुणतांबा फाटा पोहेगाव – तळेगाव – वडगावपान या मार्गावरून वळविणेबाबत प्रयोजन असल्याचे कळते औताडे यांनी हरकत अर्जात नमूद केले आहे
या हरकत अर्जात नितीन औताडे यांनी म्हटले आहे की,कोपरगाव – तळेगाव – वडगावपान या मार्गावरील तळेगाव ते झगडेफाटा रस्ता अत्यंत खराब झालेला असुन सद्यस्थितीत या रस्त्यावरून सुरु असलेल्या वाहतुकीस देखील मोठी अडचण निर्माण झालेली असुन या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडलेले आहेत. हा रस्ता राज्यमार्ग असुन या रस्त्याची वाहतुक क्षमता १३२४० मे.टन / प्रतिदिन आहे. अहमदनगर मनमाड हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असुन या रस्त्याची अवजड वाहतुक क्षमता १२५००० मे.टन / प्रतिदिन पेक्षा जास्त आहे. सदरची वाहतुक कोपरगाव, तळेगाव, वडगावपान या रस्त्यावरून वळविल्यास सदर रस्त्याचे मोठे नुकसान होईल. सद्यस्थितीत या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असताना देखील सदरच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाकरिता निधी मिळु शकलेला नाही. तसेच सदरचे रस्त्यावरून वाहतुक वळविल्यास ३५ कि.मी अंतर वाढणार असुन या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांकरीता लागणारे इंधन खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार असुन हे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान आहे.
सद्यस्थितीत पुणतांबा फाटा ते तळेगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असुन वरील सर्व बाबींचा विचार करता नगर मनमाड महामार्गावरील वाहतुकीस कोपरगाव, तळेगाव, वडगावपान, या मार्गावरून वळविण्यात येऊ नये ही विनंती. व हीच परिसराच्या वतीने माझी हरकत असल्याचे नितीन औताडे यांनी आपल्या हरकत अर्जात म्हटले आहे
Post Views:
417





