५ नं. साठवण तलाव खोदाईतील दगड मुरूमाचा वापर हद्दवाढ भागाच्या रस्त्यासाठी करावा राष्ट्रवादीची मागणी
5 no. The demand of NCP is to use the stones dug from the storage pond for the road of the demarcation area
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 12 Oct , 18.40 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :- ५ नं. साठवण तलाव खोदाईतील दगड मुरूमचा वापर हद्दवाढ भागातील व उपनगरातील रस्ते करण्यासाठी करावा अशी मागणी राष्ट्रवादी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव शहराच्या प्रलंबित असलेले विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावतांना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांचा अत्यंत जिव्हाळयाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लावला आहे. येसगांव हद्दीत नवीन साठवण तलाव क्र.५ चे काम युद्ध पातळीवर सुरु असून दररोज मोठ्या प्रमाणावर खोदाईतून मोठ्या प्रमाणावर मुरूम व दगड उपलब्ध होत असून सदरचा दगड व मुरूम रॉयलटीवर देण्याबाबत प्रशासनाकडून वृत्तपत्राद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
हा मुरूम व दगड हद्दवाढ भागातील व उपनगरातील रस्ते करण्यासाठी करावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी व तहसीलदार विजय बोरुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जेणेकरून रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात होणारा खर्च काही प्रमाणात कमी होवून कोपरगांव नगरपरिषदेवरील पडणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल असे निवेदनात म्हटले आहे
यावेळीराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, विरेन बोरावके, संदीप पगारे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, बाळासाहेब रुईकर, संदीप कपिले, धनंजय कहार, ऋषीकेश खैरनार, आकाश डागा, सचिन गवारे, मनोज नरोडे, तेजस साबळे, बाळासाहेब सोनटक्के, विलास आव्हाड, एकनाथ गंगूले, राकेश शहा, चांदभाई पठाण, विकी जोशी, फिरोज पठाण, जुनेदशेख, पीरसाहब पठाण, आशा भोसले, सुरेश दुशिंग, नारायण पवार, वाल्मिक पवार, आधार पवार, वाल्मिक भोसले, संगीता जाधव, सिताराम लव्हाळे, गोरख लव्हाळे, संतोष लव्हाळे, संतोष लव्हाळे, नामदेव लव्हाळे, सखाराम भोसले, बाबासाहेब भोसले, नाना जाधव, यादव पवार, सहादू पवार, यशवंत पवार, वामन चव्हाण, बबन चव्हाण, दादाभाऊ चव्हाण, अशोक बाबर, रामनाथ लोणारी, गोरख पवार, मन्छिंद्र पवार, जालिंदर पवार, दिपक सोनवणे, अंकुश झुंजारराव, अमित झुंजारराव, बाळु साळुंके आदी उपस्थित होते.





